अलर्ट! मुसळधार पावसाचा इशारा, पुढील ७२ तास अत्यंत महत्त्वाचे

    दिनांक :27-Sep-2025
Total Views |
मुंबई,
rain alert मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर अद्यापही कायम असून, हवामान खात्याने पुढील ७२ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे. वाऱ्याच्या दिशेत झालेल्या बदलामुळे पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागपूर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ तर पालघर जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
 

rain alert 
मुंबईत आज सकाळपासूनच पावसाने जोर पकडला असून, दुपारनंतर पश्चिम उपनगरांपासून दक्षिण मुंबईपर्यंत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. संध्याकाळच्या सुमारास वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. तापमान २६ ते २९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असून, दमट हवामानामुळे नागरिकांना त्रास जाणवण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही मुसळधार सरींचा जोर दिवसभर राहण्याची शक्यता आहे. नेरुळ, वाशी, बेलापूर, कल्याण, डोंबिवली या भागांमध्ये पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
 
 
कोकणातील rain alert रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगडच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झाला असून, स्थानिक प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची नोंद होत असून, समुद्र खवळल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला गेला आहे. या भागांत सलग तीन दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पालघर जिल्ह्याला जरी यलो अलर्ट देण्यात आला असला तरी, किनारी व ग्रामीण भागात सततच्या पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून, स्थानिक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पालघरमध्ये तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.दरम्यान, राज्याच्या मराठवाडा भागातही पावसाचा जोर वाढला आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या जिल्ह्यांतील शाळा व महाविद्यालयांना तात्पुरती सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.राज्यभरात पावसामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य आपत्तींना तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊन हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.