नागपूर,
Rashtriya Swayamsevak Sangh राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष असून या निमित्ताने तरुण स्वयंसेवकांची उद्या शनिवारी सायंकाळी नागपुरात तीन ठिकाणांहून पथसंचलने निघणार असून सायंकाळी ठीक 7.45 वाजता ती सीताबर्डीवरील व्हरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येतील. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत तेथे अवलोकन करतील.
पहिले कस्तुरचंद पार्क, दुसरे यशवंत स्टेडियम व तिसरे अमरावती रोडवरील हॉकी मैदानातून निघेल. सायंकाळी 7 वाजता गणवेशधारी स्वयंसेवक मैदानात सज्ज (संपद) राहतील. मोहिते, लालगंज, बिनाकी व सदर भागातील स्वयंसेवकांचे पथसंचलन कस्तुरचंद पार्कमधून निघेल. संविधान चौक, झिरो माईल, व्हरायटी चौक, महाजन मार्केट, हॉटेल गणराज, टेकडी हनुमान मंदिर मार्ग, झिरो माईल, संविधान चौक मार्गे कस्तुरचंद पार्कमध्ये परत येईल.
इतवारी, अजनी, अयोध्या व नंदनवन भागातील स्वयंसेवकांचे पथसंचलन यशवंत स्टेडियममधून निघेल. मुंजे चौक, व्हरायटी चौक, झाशी राणी चौक, पंचशील चौक, जनता चौक, हम्पयार्ड टी पॉइंट, धंतोली पोलिस ठाणे, मेहडिया चौक मार्गाने यशवंत स्टेडियममध्ये परत येईल. धरमपेठ, त्रिमूर्ती, सोमलवडा, गिट्टीखदान भागातील स्वयंसेवकांचे पथसंचलन हॉकी मैदानातून निघेल. व्हरायटी चौक, टी पॉइंट, विद्यापीठ, महाराजबाग चौक मार्गाने हॉकी मैदानात परत येईल.