तांडाटोला शाळेचे दोन शिक्षक निलबिंत

सीईओ एम. मुरूगानंथमचा दणका

    दिनांक :27-Sep-2025
Total Views |
गोंदिया, 
tandatola-teacher-nilbint : शालेय वेळेत उपस्थित न राहणार्‍या तालुक्यातील तांडाटोला येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षिकेवर २६ सप्टेंबर रोजी जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांनी निलंबनाची कारवाई केली.
 
 
lkj
 
 
 
जिल्हा परिषदेच्या शांळामध्ये शिक्षक उशीरा येत असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम शाळा सुरु होण्याच्या वेळेआधीच आकस्मिक भेट देत आहेत. त्यातच २६ सप्टेंबरला गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या तांडाटोला येथील शाळेला सकाळी १०.३० वाजता आकस्मिक भेट दिली. यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक यू. यू. उके व सहाय्यक शिक्षिका कौशल्या कटरे हे गैरहजर असल्याचे दिसून आले. तसेच त्यांनी कोणत्याही प्रकारचा रजेचा अर्ज सादर केला नसल्याचे निदर्शनास आले. प्रसंगी त्यांनी आपल्या पदाच्या कर्तव्यात कसूर केल्याचे कारण देत जिल्हा परिषद सेवा नियमांचा भंग केल्याने शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र ठरत असल्याने तात्काळ प्रभावाने २६ सप्टेंबरपासून निलंबीत करण्यात आल्याचे आदेश काढले. निलबिंत काळात यू. यू. उके यांना पंचायत समिती अर्जुनी मोरगाव तर कौशल्या कटरे यांना पंचायत समिती गोरेगाव येथे हलविण्यात आले आहे. तर याच पंचायत समितीतंर्गत येत असलेल्या एका शाळेचे व आमगाव तालुक्यातील एका शाळेचे शिक्षक सुध्दा निलबंनाच्या वाटेवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.