ठाणेगावची जगदंबा माता भाविकांचे श्रद्धास्थान

* शारदीय नवरात्रीनिमित्त भतांची रीघ

    दिनांक :27-Sep-2025
Total Views |
कारंजा (घा.), 
thanegaon-jagdamba-mata : तालुक्यातील अवघ्या ७ किमीवर ठाणेगावातील प्राचीन जगदंबा मंदिर जिल्ह्यासह जिल्हा बाहेरील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
 
 
 
k
 
 
 
ठाणेगाव परिसरात हे हेमाडपंथी मंदिर आहे. या जगदंबा मंदिरात नागपूर-वर्धा जिल्ह्यातील नवरात्री उत्सवा दरम्यान देवीचरणी माता टेकविण्यासाठी येतात. मंदिराच्या बांधकामात वापरल्या गेलेल्या हेमाडपंथी वास्तूकला श्रीमंताची व पुराणतेची साक्ष देणारी आहे. मंदिर पाहताना मंदिराचे प्रवेशद्वार सभामंडप थोडे खोलात असलेले गर्भगृह व मंदिराच्या आतील व बाहेरील वास्तूकला शिल्पकला व कलाकुसर येथे येणार्‍यांना भुरळ पडतात. भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी देवस्थानातील संचालक मंडळ या नवरात्र उत्सवात घेतात.
 
 
मंदिराचे बांधकाम साधारणत: बाराव्या किंवा तेराव्या शतकातील असावे, असा अंदाज आहे. हे हेमाद्रीपंत पंडित या देवगिरीच्या यादव राजाच्या दरबारात असलेल्या मुख्य प्रधान तसेच वास्तुविशारदाचा जीवनकाळ होता. त्यांच्या वास्तुकलेतील निपुणतेमुळे व त्यांनी विकसित केलेल्या बांधकाम शैली आणि कार्यामुळे हेमाद्री पंडिताच्या नावाने पुढे हेमाडपंथी वास्तुकला म्हणूनही बांधकाम पद्धती प्रसिद्ध झाली. ती वास्तुकला म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने केवळ दगडावर दगड रचून दीर्घकाळ टिकणार्‍या वास्तूचे निर्माण करण्यात आलेले आहे. गर्भ गृहातून खाली उतरल्यावर शिवलिंगाच्या रूपाने व आई अकाबाई बाकाबाई स्वरूप जगतकारिणी देवी जगदंबा मातेच्या रूपाने शिव व शतीच्या झालेल्या अद्भूत संगमाचे दर्शन घडते. जगदंबा माता मंदिर परिसर बराच मोठा असून सर्व बाजूंनी दगडी भिंत बांधून सुरक्षित केला आहे. दोन्ही बाजूच्या भिंतीवर दोन शैव द्वारपालाच्या कोरीव मूर्ती आपले लक्ष वेधतात. मुख्य मंदिरातील घाबरातील देवीचे दुरून दर्शन होते. दोन्ही बाजूला सिंहाच्या आकर्षक मूर्ती आहेत. वर्षभर येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम पार पडतात.
 
गाभार्‍याच्या दिशेने नंदीची मूर्ती उभी
 
 
ठाणेगाव येथील जगदंबा देवी मंदिर जरी जगदंबा मातेच्या नावाने प्रसिद्ध असले तरी त्यातील गर्भगृहात अस्तित्वात असलेल्या मोठ्या आकाराच्या पुरातन शिवलिंग व मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एका चार खांबी मंडपाच्या चौथ्यावर गाभार्‍याच्या दिशेने मुख करून असलेल्या नंदीची मूर्ती तसेच द्वार मंडपाच्या प्रवेश दारावरील शैव द्वारपालाच्या रेखीव मूर्तीमुळे शिव मंदिर म्हणून बांधले गेले असावे. काल औघात येथे गाभार्‍याच्या मागच्या भिंतीला लागून स्वयंभू अशा श्री जगदंबा मातेची स्थापना करण्यात आली, अशी मंदिराबाबत शयता वर्तवली आहे.