उंबर्डा बाजार,
Heavy Rainfall : उंबर्डा बाजार परिसरात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप पिकांना मोठ्या प्रमाणात दणका बसला असून या पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेत शिवारामध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी ओसंडून वाहत आहे. शेतीसह वाहतुकीवरही याचा विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे शेती नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्यांच्या वतीने केली जात आहे.

उंबर्डा बाजार, सुकळी, प्रीप्री, दुघोरा, सोमठाणा, कामठवाडा आधी ठिकाणी सोयाबीन, कपाशी, तूर इतर पिकांमध्ये पाणी साचल्याने ही पिके पाण्यात बुडालेली आहेत. त्यामुळे शेतीला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. येन सोयाबीन काढणीच्या अवस्थेत असतांना सोयाबीनच्या शेंगा काळ्या पडत असल्याने शेतकर्यांना लाखोंचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे भाजीपाल्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यात २७ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन तूर कपाशी व आधी पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्यामुळे नुकसानग्रस्त शेताची पाहणी करतांना सहाय्यक कुषी अधिकारी के. के. गाडगे उपसरपंच अशोकराव मोरे महेश देशमुख, अंकुश रनमाळे, इत्यादीनी शेतीची पाहणी केली.