नागपूर,
Vidarbha Gaurav Pratishthan “विदर्भ गौरव प्रतिष्ठान” तर्फे दिला जाणारा कुशल संघटक पुरस्कार २०२५ महिला महाविद्यालय, नंदनवन व दादिबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा, महालाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस यांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नंदनवन भाग संघचालक श्री. अशोक बुजोने यांनी त्यांचा पुष्पगुच्छ, “पंच परिवर्तन” व “भविष्य का भारत” ही पुस्तके भेट देऊन सत्कार व अभिनंदन केले. Vidarbha Gaurav Pratishthanया प्रसंगी रेशिमबाग नगर कार्यवाह अतुल पोफळी आणि ज्येष्ठ स्वयंसेवक सुभाष सिरसीकर उपस्थित होते.
सौजन्य : प्रवीण घुले,संपर्क मित्र