वर्धा,
PDA Stenting : गर्भधारणेनंतर अवघ्या साडेपाच महिन्यात जन्मलेल्या, दोन किलोपेक्षाही कमी वजन असलेल्या आणि अत्यंत गुंतागुंतीची अवस्थेतील नवजात बाळाच्या जन्मतः लाभलेल्या गंभीर हृदयविकारावर सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील नवजात शिशुतज्ज्ञांनी पीडीए स्टेंटिंगच्या सहाय्याने अद्ययावत उपचार करीत नवजीवन प्रदान केले.
नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील या नवजात शिशुला सावंगी रुग्णालयातील निओनॅटोलॉजी विभागात दाखल करण्यात आले होते. तपासणीत बाळाला जन्मजात हृदयविकार म्हणजेच टेट्रालॉजी ऑफ फॅलोट विथ पल्मोनरी अट्रेशिया असल्याचे निदान झाले. बाळाचे प्राणवायू संतृप्ती (सॅच्युरेशन) न राखल्याने लगेचच तिला इंट्युबेट करण्यात आले आणि आपत्कालीन स्थितीत पीडीए स्टेंटिंग करण्याचा निर्णय नवजात शिशुतज्ज्ञांनी घेतला. पीडीए स्टेंटिंग ही हृदय कॅथेटरायझेशन प्रक्रिया आहे ज्यामध्ये जन्मजात हृदयरोग असलेल्या बाळामध्ये रतप्रवाह सुरळीत करण्यासाठी पीडीए म्हणजेच पेटंट डट्स आर्टेरिओसस नावाच्या रतवाहिनीमध्ये एक लहान स्टेंट ठेवला जातो.
ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया रुग्णालयातील तज्ज्ञ डॉ. वैभव राऊत, डॉ. सागर कारोटकर, डॉ. रेवत मेश्राम, डॉ. महावीर लाकरा व डॉ. राशी गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. उपचारादरम्यान बाळाला ताप आल्याने मेंदूज्वर (मेनिन्जायटिस) असण्याची शयता निर्माण झाली. त्यासाठी लंबर पंचर करून तपासणी करण्यात आली आणि योग्य वेळी प्रतिजैविक औषधोपचार सुरू करण्यात आला. या काळात बाळाला वारंवार झटके येऊ लागले.
या अवस्थेला रिफ्रॅटरी सीझर म्हणून ओळखले जाते व ही अवस्था अतिशय गंभीर असते. मात्र, डॉटरांनी पायरीडॉसिन थेरपी आणि अँटी-एपिलेप्टिक औषधोपचारांचा वापर करून बाळाला येणारे झटके नियंत्रणात आणले. नवजात शिशूचे वजन अत्यंत कमी असताना आणि त्यातही आरोग्याबाबत गुंतागुंत निर्माण झाली असताना डॉटरांनी स्टेंटिंगची आव्हानात्मक प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्णत्वाला नेली. डॉटरांच्या कौशल्यपूर्ण प्रयत्नांनी बाळाची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. काही दिवस चाललेल्या या संघर्षावर मात करीत बाळ पूर्णपणे बरे झाले आणि रुग्णालयातून बाळाला सुट्टी देण्यात आली. विशेष म्हणजे, हे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आले