मोकाट श्वनाच्या हल्ल्यात ८ वर्षीय विद्यार्थिनी गंभीर

    दिनांक :27-Sep-2025
Total Views |
कारंजा लाड,
Stray Dog Attack : शहरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल आहे. २७ सप्टेंबर रोजी काझी प्लॉट येथील राबिया बसरी ग्यासु बेग वय ८ वर्ष ही तिसरीत शिकणारी चिमुरडी भटया कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली.
 
 
jk
 
 
 
राबियावर पाच ठिकाणी खोल जखमा झाल्या असून, तिला तात्काळ सामाजिक कार्यकर्ते शारीख शेख आणि तिचे वडील ग्यासु बेग मिर्झा यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉटरांनी प्राथमिक उपचार करून रेबीजची लस देण्यात आली. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नगर परिषदेकडे तातडीने ठोस उपाययोजना करून शहराला भटया कुत्र्यांच्या दहशतीतून मुक्त करण्याची मागणी होत आहे. वेळीच योग्य पावले उचलली नाहीत, तर लहान मुलांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो,असा इशारा नागरिकांनी दिला आहे.