कत्तलीसाठी नेणार्‍या २२ गोवंशाना जीवनदान

    दिनांक :27-Sep-2025
Total Views |
वाशीम, 
Illegal transportation of cattle : अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक करुन कत्तलीसाठी नेणार्‍या २२ गोवंशांना पोलिसांच्या धाडसी कारवाईने जीवनदान मिळाले. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वाशीम - हिंगोली रोडवरील तोंडगाव नाका येथे २६ सप्टेंबर रोजी नाकाबंदी करण्यात आली. यावेळी वाशीमकडून हिंगोलीकडे जाणारे संशयित वाहन (क्र. एमएच ४० बीजी ४०७६) दिसून आले. वाहन थांबविण्याचा इशारा दिला असता चालकाने वेग वाढवून वाहन पळविले. पोलिसांनी जवळपास १० किमीपर्यंत पाठलाग करून २२ गुरांना जीवनदान दिले.
 
 
 
k l
 
 
 
पोलिस तपासात वाहनचालकाने नाव रमीस रजा खान (वय २५ ) रा. कामगारनगर, नागपूर असे सांगितले. त्याने ही गुरे नागपूरहून कत्तलीसाठी हैदराबादला नेत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी १४ लाख रुपये किंमतीचे वाहन आणि सुमारे ४.२५ लाख रुपये किंमतीची गुरे असा एकूण १८.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त करून गुरे शिरपूर येथील गोशाळेत हलवली.
 
 
याप्रकरणी वाशीम ग्रामीण पोलिस ठाण्यात गोवंश संरक्षण अधिनियम १९७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी नवनीत अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आली.