राजभाषा पंधरवड्यात एकदिवसीय कार्यशाळा

    दिनांक :27-Sep-2025
Total Views |
नागपूर ,
Western Coalfields राजभाषा पंधरवडा 2025 अंतर्गत वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या मानव संसाधन विकास विभागात आज एकदिवसीय राजभाषा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मुख्यालय व क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महाप्रबंधक मानव संसाधन ,व राजभाषा विभागप्रमुख पी. नरेंद्र कुमार, महाप्रबंधक यू. सी. गुप्ता तसेच ज्येष्ठ साहित्यिक व निओग थेरपिस्ट डॉ. प्रवीण डबली उपस्थित होते.आपल्या भाषणात महाप्रबंधक यांनी सांगितले की, कार्यशाळेतून मिळालेले ज्ञान कार्यालयीन कामकाजात हिंदीला प्रोत्साहन देण्यासाठी वापरावे आणि ते सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवावे.

bhasha 
 
प्रथम सत्रात डॉ. प्रवीण डबली यांनी “कार्यालयीन कामकाजात हिंदीचा वापर” या विषयावर मार्गदर्शन करताना तांत्रिक शब्दसंपदा व राजभाषेचे महत्त्व स्पष्ट केले. Western Coalfieldsद्वितीय सत्रात आयकर विभागाचे उपसंचालक अनिल त्रिपाठी यांनी “राजभाषेत तांत्रिक टूल्सचा वापर” या विषयावर माहिती दिली.तृतीय सत्रात व्ही.एन.आय.टी. चे ओएसडी सत्येंद्र प्रसाद सिंह यांनी “राजभाषा हिंदीच्या वापरातील अडचणी व उपाय” या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यशाळेचे संचालन अनुवादक दीपक सिंह चौहान यांनी केले.
सौजन्य:डॉ. प्रवीण डबली,संपर्क मित्र