आष्टी
Rajú Nimbhorkar accident,आष्टी-मोर्शी मार्गांवर असलेल्या खुले कारागृह प्रवेश द्वारासमोर दोन दुचाकींची धडक झाली. यात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात २७ रोजी झाला. राजू उर्फ हेमंत निंभोरकर रा. लिंगापूर असे मृतकाचे नाव आहे. हेमंत हे भाजपाचे जिल्हा महामंत्री कमलाकर निंभोरकर यांचे बंधू आहेत.
आष्टी तालुयातील लिंगापूर येथील राजू उर्फ हेमंत निंभोरकर व उमेश गोडबोले हे दोघे एम. एच. ३२ ए. झेड. ४४३० क्रमांकाच्या दुचाकीने मोर्शी येथे गेले होते. ते परतीचा प्रवास करीत असताना दुचाकी खुले कारागृह परिसरात आल्यावर गतिरोधक चुकविण्याच्या नादात वाहन थेट एम. एच. २९ सी. जी. ४०४२ क्रमांकाच्या दुचाकीवर धडकली. दुचाकीने यश पवार व सोनाली पेठेकर हे मोर्शीच्या दिशेने जात होते. यात दुचाकी चालक उमेश गोडबोले हा गंभीर जखमी झाला तर राजू उर्फ हेमंत याचा मृत्यू झाला. दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात झाल्याचे लक्षात येताच आष्टी पोलिसांना माहिती देण्यात आली. या अपघाताची नोंद आष्टी पोलिसांनी घेतली आहे.