कोरियन ड्रामामध्ये झळकणार एकता कपूर?

२९ सप्टेंबरला उलगडणार गूढ

    दिनांक :28-Sep-2025
Total Views |
मुंबई,
ekta kapoor, भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रात आपली खास ओळख निर्माण करणारी निर्माती एकता कपूर आता एका नव्या आणि अनपेक्षित भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता आहे. टीआरपीच्या यशाच्या शिखरावर पोहोचवलेले ‘क’ अक्षराने सुरू होणारे त्यांच्या मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. मात्र, यंदा त्यांनी एक नवा अध्याय सुरू करत कोरियन ड्रामामध्ये झळकण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत दिले आहेत.
 

ekta kapoor 
एकता कपूरने अलीकडेच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना एक ‘सरप्राइज’ दिले. या व्हिडीओत ती म्हणते, “मी K-ड्रामाची ओजी क्वीन आहे. तुमच्यासाठी एक मोठी अपडेट घेऊन आली आहे. मी एका कोरियन ड्रामामध्ये झळकणार आहे.” या व्हिडीओमुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतेची लाट उसळली आहे. व्हिडीओसोबत एकता कपूरने २९ सप्टेंबर दुपारी १ वाजता ‘सरप्राइज’ उघड होणार असल्याचे म्हटले आहे.
 
 
हा व्हिडीओ शेअर होताच, सोशल मीडियावर चर्चेने जोर धरला आहे. अनेक जण उत्सुकतेने वाट पाहत आहेत की, एकता कपूर खरोखरच कोरियन ड्रामामध्ये अभिनय करताना दिसणार आहेत की ती केवळ एखाद्या कोरियन मालिकेचा हिंदी रिमेक प्रेक्षकांसमोर आणणार आहे. काही युझर्सचा असा अंदाज आहे की ती एखाद्या लोकप्रिय कोरियन मालिकेचे हिंदी रूपांतर प्रोड्यूस करत आहे.गेल्या काही वर्षांमध्ये भारतात कोरियन ड्रामा आणि के-पॉपला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. विशेषतः तरुणाईमध्ये याचा मोठा प्रभाव आहे. अशा वेळी, एकता कपूरसारखी यशस्वी निर्माती जर कोरियन कंटेंटच्या दिशेने पाऊल टाकत असेल, तर ती भारतीय मनोरंजन क्षेत्रातील एक महत्त्वाची पावले मानली जातील.दरम्यान, एकता कपूर सध्या तिच्या आयकॉनिक मालिकेच्या दुसऱ्या पर्वावर काम करत आहे – ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’. या नव्या पर्वालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.एकता कपूर कोरियन ड्रामामध्ये प्रत्यक्ष दिसणार का, की ती केवळ निर्माती म्हणून सहभागी होणार, याबाबत अधिकृत माहिती येत्या २९ सप्टेंबरला मिळणार आहे. तोपर्यंत तिच्या चाहत्यांमध्ये उत्कंठा कायम आहे.