महाराष्ट्र : ७२ तासांचा हाय अलर्ट; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

    दिनांक :28-Sep-2025
Total Views |
मुंबई,  
red-alert-for-maharashtra भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यासाठी मोठा इशारा दिला असून, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी पुढील ७२ तास रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात अति मुसळधार पावसासह सतत पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

red-alert-for-maharashtra
 
मुंबईसह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये तीव्र हवामानाची शक्यता असून, सिंधुदुर्ग व नाशिकच्या घाट भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. red-alert-for-maharashtra मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
सरकार व प्रशासन सज्ज
राज्य आपत्कालीन ऑपरेशन्स सेंटरने सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. red-alert-for-maharashtra विशेषतः शहरी पूर, घाट भागातील भूस्खलन आणि अचानक पूर येण्याचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचे आदेश देण्यात आले आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत प्रशासन हाय अलर्टवर असून, २४ तास नियंत्रण कक्ष सुरु ठेवणे, सखल भागातील पाणी काढण्यासाठी पंप तैनात करणे, नद्यांच्या प्रवाहावर व धरणातील विसर्गावर लक्ष ठेवणे यासारख्या उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आपत्कालीन उपकरणे, दुरुस्ती पथके आणि पथदर्शी यंत्रणा सज्ज ठेवण्याची तयारी आहे.
नागरिकांसाठी मार्गदर्शन
राज्य सरकारने नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला आहे:
सखल भागात जाणे टाळा.
मुसळधार पावसात नद्या, कालवे व पुलांच्या जवळ जाऊ नका.
विजांच्या कडकडाटात झाडाखाली थांबू नका.
आवश्यक असल्यास स्थानिक आश्रयस्थानी तात्काळ संरक्षण घ्या.
हवामान सुधारत नाही तोपर्यंत अनावश्यक प्रवास व पर्यटन टाळा.