आर्णी,
Arunavati dam gates open शनिवारी पाऊस व अरुणावती प्रकल्पाचे दरवाजे घडल्याने संध्याकाळी 4 वाजेपासून शहरातील काही भागात नदी व नाल्याला पूर आल्याने शहरातील 250 घरांमध्ये पाणी शिरले असून स्थिती अधिक बिकट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
शनिवार, 27 सप्टेंबरला सकाळपासूनच व दुपारी 12 वाजतापासून 11 दरवाजे उघडले. त्यानंतर 5 वाजता पूर्ण अकरा दरवाजे 75 सेमीने उघडल्याने आर्णीतील अरुणावती नदीला पूर आला व शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी सकाळपासून नागरिक आणि व्यापाèयांत पुराची धडकी भरली होती.
प्रशासन या पूरस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे. अरुणावती प्रकल्पाचे शनिवार, 2 सप्टेंबरला पहाटे 11 दरवाजे उघडल्याने बाबा कंम्बलपोष दर्ग्याजवळील अरूणावती नदीला पूर आला. यामुळे शहरातून वाहणारा नाला तुंबला आणि नाल्याचे पाणी वाहणे थांबल्याने नदीचे पाणी नाल्यात येत असल्यामूळे आर्णी शहरातील प्रकाशनगर, मोमीनपूरा, शास्ञीनगरमधिल जवळपास 250 घरांमध्ये पाणी शिरल्याचा अंदाज आहे.
पाण्याची पातळी आणखी वाढली तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांना त्यांच्या घरातून नगरपालिकेच्या शाळांमध्ये हलवण्यात आले. त्यांची तेथे सामाजिक कार्यकर्त्यांकडुन व शासनाकडुून जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पूरस्थितीवर आज दुपारपासून तहसीलदार वैशाख वाहूरवाघ, नायब तहसीलदार प्रमोद गुल्हाने, उदय तुंडलवार, नगर परिषद मुख्याधिकारी रवींद्र राऊत, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच अग्नीशमन दलाची चमू तैनात असून पूरग्रस्त भागात भेट देऊन सर्वतोपरी मदतीचे कार्य करीत आहेत.
यावेळी त्यांच्यासमवेत भाजपा शहर अध्यक्ष निखिल ब्राम्हणकर, नवाज, महेश काळबांडे व इतर मंडळी होती. ग्राम महसूल अधिकारी, कर्मचाèयांसह नगर परिषद मुख्यधिकारी रविंद्र राऊत, नगर परिषद कर्मचारी व ठाणेदार नीलेश सुरडकर पोलिस ताफ्यासह लक्ष ठेवून आहेत. पूरग्रस्ताच्या मदतीसाठी आर्णीतील सामाजिक कार्यकर्ते माजी बांधकाम सभापती अनवर पठान, माजी उपनराध्यक्ष कादर इसाणी, जावेद सोलंकी, पत्रकार आरीफ शेख, रहेमान शाह, निखिल ब्राम्हणकर, नवाज सर्व मंडळी सज्ज आहे.
आर्णी-आसरा, आर्णी-अंतरगाव रस्ता बंद
शनिवारी आलेल्या पुराने आर्णी पोलिस ठाण्याजवळून जाणारा अंतरगाव रस्ता व अरूणावती नदीच्या पुलावरून 4 फुट पाणी वाहात होते. आर्णी-आसरा मार्गावर आर्णीजवळील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हाही रस्ता बंद होता. मदत कार्यासाठी एसडीआरएफची चमू तैनात करण्यात आली होती.