शहरात भारत महा ई-व्ही रॅलीचे स्वागत

    दिनांक :28-Sep-2025
Total Views |
नागपूर,
Bharat Maha EV Rally तब्बल २१,००० किमी आणि १०० दिवसांचा प्रवास करणारी “भारत महा ई-व्ही रॅली” नागपूरात दाखल झाली. मोतीबाग रेल्वे कॉलनीतील प्राचीन शिवमंदिरात पाहुण्यांचे स्वागत करून डॉ. प्रवीण डबली यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला पुढे रवाना केले.

rallyi  
 
या प्रसंगी i-FEVA चे चेअरमन डॉ. शैलेन्द्र सरोज, डॉ. राजीव मिश्रा, श्रीनिवास कुमार येर्पोट्टू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. Bharat Maha EV Rally  रॅली पथकाने RSS मुख्यालय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यालय व जीरो माईलला भेट दिली.रॅलीचे हे आयोजन नागपूरला हरित गतिशीलतेचे केंद्र बनविण्यासाठी प्रेरणादायी ठरले.
सौजन्य:डॉ. प्रवीण डबल,संपर्क मित्र