चोरद रस्त्यावरील पुल गेला वाहून

    दिनांक :28-Sep-2025
Total Views |
वाशीम,
Chorad road मंगरुळनाथ तालुयात २७ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने चोरद रस्त्यावरील पूल वाहुन गेल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. मात्र, प्रशासनाने तातडीने याठिकाणी तात्पूरत्या पुलाची निर्मिती केल्याने रहदारी सुरळीत झाली. २८ सप्टेंबर रोजी पावसाने दिवसभर उघाड दिल्याने शेतकर्‍यांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला.

Chorad road
 
 
याबाबत सविस्तर असे की, २७ सप्टेंबर रोजी मंगरुळनाथ शहर व तालुयात मुसळधार पावसाने चांगले झोडपले. नदी, नाल्या पूर आला. अनेकांच्या शेतात पाणी घुसून खरीप हंगामाचे प्रचंड नुकसान झाले. मुसळधार पावसाने चोरद मार्गावरील नाल्याला आलेल्या महापूरामुळे पूल वाहुन गेला. त्यामुळे या मार्गावरील रहदारी ठप्प झाली होती. मात्र, प्रशासनाने तत्काळ या पुलाची तात्पूरती दुरुस्ती केल्याने रहदारी पुन्हा सुरु झाली. २७ सप्टेंबर रोजी मंगरुळनाथ शहर व तालुयात मुसळधार पावसाने झोडपून काढले. नदी काठच्या शेतात पाणी घुसल्याने सोयाबीन, उडीद व इतर खरीप पिकांचे नुकसान झाले. निसर्गाच्या कोपाने शेतकरी पुरता नागवला गेला आहे. अर्धा अधिक खरीप हंगाम पुराच्या पाण्यात वाहून गेला असल्याने शेतकर्‍यासमोर मोठे संकट उभे राहीले आहे.