पूर्व विदर्भ विभागाची वार्षिक सभा

    दिनांक :28-Sep-2025
Total Views |
नागपूर,
Datta Meghe MBA Hall पूर्व विदर्भ प्रादेशिक विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा 28 सप्टेंबर रोजी श्री. दत्ता मेघे एमबीए हॉल येथे झाली. सचिव प्रदीप डोंगरे यांनी कामकाज सुरू केले. सभेत 2024-25 आर्थिक पत्रके, 2025-26 चे अंदाजपत्रक तसेच ऑडिटर नियुक्तीचे ठराव मंजूर झाले.
 

79 
 
अध्यक्ष म्हणून जीतेंद्र भोयर व सचिव म्हणून प्रदीप डोंगरे यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली. आभार प्रदर्शन, पसायदान व सहभोजनाने सभेची सांगता झाली.Datta Meghe MBA Hall यावेळी कोषाध्यक्ष सुधीर सालफळे, महिला समिती अध्यक्षा सुनंदा हरणे यांच्यासह माजी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. पुढील विशेष सभा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
 
सौजन्य:धनंजय कडूस्कर,संपर्क मित्र