हावरापेठमध्ये दुर्गा उत्सव साजरा

    दिनांक :28-Sep-2025
Total Views |
नागपूर,
Durga festival जय अंबे दुर्गा महिला उत्सव मंडळ, हावरापेठ तर्फे दुर्गा उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले. सहाव्या वर्षी साजऱ्या होत असलेल्या या उत्सवात देवी मूर्तीची स्थापना ढोलताशा, रोषणाई व मंत्रोच्चाराने करण्यात आली.

54 
 
उत्सव काळात गोंधळ, भजन, हरिपाठ, आरती, खेळ-मनोरंजन यांसह आरोग्य, रक्तदान व नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन केले आहे.Durga festival रोजच्या आरतीला परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांचा आनंद घेत आहेत.कार्यक्रमाच्या यशासाठी मंडळातील कार्यकर्ते व स्थानिक नागरिक तन-मन-धनाने सहकार्य करीत आहेत.
सौजन्य:रमेश मेहर,संपर्क मित्र