वर्धा,
Paresh Sawarkar दुर्गोत्सव आला की रंगीबेरंगी मूर्तींचा उत्साह, रोषणाईचे झगमगते दिवे, ढोल-ताशांचा नाद पण या चकाकीच्या पलीकडे शांत, मातीचा सुगंध दरवळणारा एक कोपरा आहे. हिंगणघाट तालुयातील अल्लीपूर येथे तरुण अभियंता परेश सावरकर दरवर्षी देवीला नवी ओळख देतो. ही ओळख आहे पुनर्जन्माची. कारण तो बनवतो ती मातीची दुर्गामूर्ती केवळ कलाकृती नसते तर पंधरा वर्षांपासून एकाच मातीतून घडलेली श्रद्धा आणि पर्यावरणाची जपणूक आहे.
परेश विसर्जनाच्या Paresh Sawarkar दिवशी देवीचं रूप नदीत विलीन होतं. पण, त्यासाठी वापरलेली माती विसरली जात नाही. विसर्जनानंतर तो त्या मातीतूनच पुन्हा पुढच्या वर्षी देवीची प्रतिमा साकारतो. मातीचं आयुष्य संपत नाही, ती पुन्हा फुलते, पुन्हा जिवंत होतेहा संदेश त्याच्या हातातून जन्मलेल्या मूर्तीतून दिसते. देवी मातीचीच आहे. तिच्या रूपाला पुन्हा पुन्हा जिवंत करणं म्हणजे निसर्गाचं जतन असल्याचे परेशने सांगितले. आपल्याला लहानपणापासुन छंद म्हणून देवीची मूर्ती तयार करणे सुरू केले. २०१० मध्ये दुर्गेची पहिली मुर्ती तयार केली होती. १५ वर्षांपासुन त्याच मातीची मूर्ती तयार होते. आपण मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना आईला अर्धांगवायूचा झटका आला. घरी कोणी करणारे नसल्याने आपण शिक्षण सोडून गावात आलो. आता गावातच शिकवणी वर्ग सुरू केले. कलाविष्कार नावाने संघटन तयार केले. त्या माध्यमातून गावात सांस्कृतिक चळवळ राबवत असल्याचे परेशने सांगितले.
१५ वर्षांपासुन Paresh Sawarkar देवीची आणि ७ वर्षांपासुन गणपतीची मूर्ती करू लागलो. या दोन्ही मूर्ती विक्रीसाठी नाहीत. आपण आपल्या मंडळात देवी मूर्ती स्थापन करतो. पहिल्या वर्षी फत ९० रुपये खर्च आला होता. यावर्षी ९० हजाराच्या घरात दुर्गोत्सवाचा खर्च अपेक्षित असल्याचे परेशने सांगितले. यावर्षी फत मुर्ती तयार करायला १ हजार रुपये खर्च आल्याचे पराग याने सांगितले. मुर्तीला नैसर्गिक रंगांचा स्पर्श, हाताने घडवलेला आकारही मूर्ती दिसायला जितकी मोहक तितकीच पर्यावरणस्नेही आहे.
बालपणापासून जडलेली मातीशी नाळ, आईसारखी जपलेली मातीची उब आणि श्रद्धेतून आलेली कलाहे सर्व मिळून प्रत्येक वर्षी दुर्गोत्सवाला नवं प्राणवायू देतो. कृतीतला सातत्य पंधरा वर्षांची कहाणी आमचच्या गावची शान असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी दिली.