विष प्राशन करून शेतकऱ्यांची आत्महत्या

    दिनांक :28-Sep-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा वणी,
Anil Mandavkar तालुक्यातील पठारपुर येथील अनिल उत्तम मांडवकर (50) या शेतकèयाने 26 सप्टेंबरला संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास विषारी औषध प्राशन करुन जीवनयात्रा संपविली आहे. या प्रकरणी त्यांचा मुलगा ओम अनिल मांडवकर (21) यांनी वणी पोलिस स्टेशनला दिलेल्या जबाबावरून मर्ग दाखल करण्यात आला आहे.
 
 

Anil Mandavkar
तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मृतक अनिल मांडवकर यांना दारूचे व्यसन होते. 26 रोजी सायंकाळी ओम मांडवकर पाणी आणण्यासाठी घराबाहेर गेला होता. काही वेळाने परतल्यावर घरात विषारी औषधाचा वास जाणवला. याबाबत वडिलांना विचारणा केली असता काहीही उत्तर न देता ते स्थिर बसलेले दिसले. जवळ जाऊन पाहणी केली असता त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी शेजारी नातेवाईक विजय मांडवकर यांच्या मदतीने वडिलांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शनिवार, 27 सप्टेंबरला शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतक अनिल मांडवकर यांच्यामागे पत्नी व दोन मुले आहेत. तसेच त्यांच्याकडे 12 एकर शेती आहे. या घटनेबाबत वणी पोलिसांनी मर्ग दाखल करून घटनास्थळ मुकुटबन पोलिस ठाणे हद्दीत असल्याने पुढील तपासाची कागदपत्रे तेथील पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली.