हिंगणघाट,
hinganghat-rain-lightning-strikes : शहरासह तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसात विजांच्या धुमाकूळाने मोठे नुकसान झाले आहे. तालुयातील बुरकोणी येथील शेतकरी शंकर ठाकरे यांच्या शेतात वीज पडल्याने बैलाचा मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे तालुयातील अनेक गावातील शेतकर्यांची ५६ विहिरी खचल्याचे पंचनामे हाती आल्याची माहिती तहसीलदार योगेश शिंदे यांनी दिली.
पावसामुळे शहरात चार व नांदगाव येथे एक अशा पाच घरांच्या भिंती पडल्याची माहिती आहे. शेतकर्याच्या विहिरी खचल्याने गहू, तूर, चना पिकाची पेरणी कशी करायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एका ट्रॅटरवर झाड पडल्याने ट्रॅटरचे नुकसान झाले आहे. शुक्रवार २६ रोजी शहरात सहा ठिकाणी वीज पडल्याची घटना घडली. यात संत सयाजीनगर मधील माजी नगराध्यक्ष नीलेश ठोंबरे यांच्या घरावर वीज पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. वीज पडल्याने भिंत पडली तर इन्व्हर्टर, सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा जळाले. दुसरी घटना नन्नाशाह वार्ड येथील अंकुश अरतपायरे यांच्या घरी वीज पडल्याने घरावरील कमानीचे टॉवरचे दोन तुकडे झाले.
घरातील इलेट्रॉनिक साहित्य टीव्ही, पंखा, फ्रिज बंद पडले. या विजेचा झटका शेजारी असलेल्या ज्ञानेश्वर राऊत यांच्याघरी सुद्धा पडला. त्यांचे सर्व इलेट्रॉनिक साहित्य खराब झाले. तिसरी घटना येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या समोर घडली. मैदानात पाणी साचलेल्या खड्ड्यात वीज पडली. चौथी घटना अब्दुल्लानगरात किशोर दिघे यांच्या घरासमोर वीज पडली. याव्यतिरित आणखी दोन ठिकाणी वीज पडल्याने मोठे नुकसान झाले.
मुसळधार पावसाने ग्रामीण क्षेत्रात पिकांना मोठा फटका बसला आहे. शनिवार २७ रोजी सुद्धा शहर व ग्रामीण भागात दुपारी १२ वाजता मुसळधार पाऊस झाला. यामुळे आता हिंगणघाट तालुयात ओला दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.