पूरग्रस्त भागाची भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी केली पाहणी

    दिनांक :28-Sep-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद, 
Aarti Fupate : शहरासह तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले असून शेतकèयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतातील उभे पीक पाण्याखाली जाऊन बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे.
 
 
 
y28Sept-Fupate
 
 
 
या पार्श्वभूमीवर रविवार, 28 सप्टेंबरला पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी सर्कल अंतर्गत येणाèया देवगव्हाण, इसापूर, गौळ तसेच शेंबाळपिंपरी आणि इतर भागातील नुकसानग्रस्त शेतजमिनींची जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी स्वतः बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी व ग्रामस्थांचे सांत्वन केले.
 
 
डॉ. फुपाटे यांनी शेतकèयांना धीर देत आश्वस्त केले की, निसर्गराजाच्या या प्रचंड कोपामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. मात्र भारतीय जनता पार्टीचे सरकार सदैव शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे आहे. नुकसानग्रस्तांना शासकीय मदत मिळणारच असून सरकार त्यासाठी कटिबद्ध आहे.
 
 
यावेळी डॉ. आरती फुपाटे यांनी गावोगावी फिरून ग्रामस्थांचे म्हणणेही ऐकून घेतले. शेतकèयांच्या अडचणी शासनापर्यंत पोहचवून तत्काळ मदत मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
 
 
यावेळी जिल्हा सचिव महेश काळेश्वरकर, शेंबाळपिंपरी मंडळ अध्यक्ष डॉ. अजित चंदेल, आशिष अग्रवाल, राजेश शर्मा, गौतम वाहुळे, लक्ष्मण सूर्यवंशी, शैलेश मेटकर, अनिता चंदेल, नंदा चंदेल इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.