शिरपूर जैन,
Jagdamba Devi temple Shirpur, येथील जगदंबा देवी संस्थानवर गजानन महाराजांच्या मंदिरासमोर तब्बल एक लाख रुपये खर्च करून स्वखर्चाने येथील कपडा व्यावसायिक संजय जाधव यांनी फरशी बसवून दिली. संस्थानच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
शिरपूर जैन येथे जगदंबा देवीचे पुरातन व प्रसिद्ध मंदिर आहे. काही दिवसापूर्वीच या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. दरवर्षी घटस्थापने दरम्यान महाप्रसाद व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन वर्षभर करण्यात येत असते. संस्थानच्या वतीने येथे गजानन महाराजांचे मंदिर सुद्धा बांधण्यात आले आहे. याठिकाणी शासकीय निधीमधून मंदिरासमोर सभा मंडप बांधण्यात आला आहे. मात्र, कंत्राटदाराच्या निष्काळीपणामुळे व निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे थोड्याच दिवसांमध्ये तेथे टाकलेला सिमेंटचा कोबा पूर्णपणे फुटला होता. दर्शनाला आलेल्या भाविकांच्या पायाला सिमेंट लागत होते. व भाविकांना खूप त्रास सहन करावा लागत होता. येथील प्रसिद्ध कपडा संजय जाधव यांच्या सदर बाब लक्षात आली व त्यांनी गतवर्षीच गजानन महाराजांच्या मंदिरासमोर स्वखर्चातून स्टाईल बसून देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. व त्यानुसार त्यांनी ते काम तब्बल एक लाख रुपये खर्च करून पूर्ण केली आहे.
येथील भाविक भक्तांकडून सदर कामाबद्दल त्यांचे अभिनंदन व मोठे कौतुक होत आहे. धार्मिक व सामाजिक कार्या मध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. दरम्यान जगदंबा देवी संस्थांनच्या वतीने, विश्वस्त प्रदीप देशमुख व दिक्षीत महाराज यांनी त्यांचे शाल, श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित केले.