'जॉली एलएलबी 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा कायम

नवव्या दिवशी ६.२५ कोटींची कमाई, एकूण कमाई ८४ कोटींच्या घरात

    दिनांक :28-Sep-2025
Total Views |
मुंबई,
Jolly LLB 3 बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांची प्रमुख भूमिका असलेली बहुचर्चित चित्रपट ‘जॉली एलएलबी 3’ १९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. चित्रपटाने प्रदर्शनानंतर केवळ नऊ दिवसांत ८४ कोटी रुपयांची कमाई केली असून, लवकरच तो १०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
 

Jolly LLB 3  
‘जॉली एलएलबी 3’ मध्ये अक्षय कुमार आणि अरशद वारसी दोघेही वकिलांच्या भूमिकेत झळकत आहेत आणि विशेष म्हणजे, दोघांचं पात्र ‘जॉली’ या नावानेच ओळखलं जातं. त्यांच्या एकमेकांविरुद्धच्या कोर्टरूम ड्रामाने प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन केलं असून, कथानकातला सामाजिक आशयही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
सुभाष कपूर दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १२.५ कोटींची दमदार ओपनिंग घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २० कोटी आणि तिसऱ्या दिवशी २१ कोटी रुपयांची कमाई करून चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्येच मजबूत पकड मिळवली. चौथ्या दिवशी ५.५ कोटी, पाचव्या दिवशी ६.५ कोटी, सहाव्या दिवशी ४.५ कोटी आणि सातव्या दिवशी ४ कोटींची कमाई करत पहिल्या आठवड्यात एकूण ७४ कोटींचा गल्ला जमवण्यात चित्रपट यशस्वी ठरला.
.
विशेष म्हणजे, Jolly LLB 3 ‘जॉली एलएलबी 3’ ने अक्षय कुमारच्याच पॅडमॅन’आणि ओह माय गॉड’ या यशस्वी चित्रपटांचाही विक्रम मोडला आहे. दोन्ही चित्रपटांनी सुमारे ८१ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे 'जॉली एलएलबी 3' अक्षयच्या यशस्वी चित्रपटांच्या यादीत आणखी एक नाव घालणार हे निश्चित आहे.या चित्रपटात अक्षय आणि अरशद व्यतिरिक्त अमृता राव, हुमा कुरैशी, सौरभ शुक्ला, गजराज राव, अन्नू कपूर आणि सीमा बिस्वास यांसारख्या अनुभवी कलाकारांचा समावेश आहे. कोर्टरूम ड्रामा आणि सामाजिक विषयांचा सुरेख संगम असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता, तो लवकरच १०० कोटींचा टप्पा पार करेल, असा विश्वास चित्रपटसृष्टीत व्यक्त केला जात आहे.