मुंबई,
Devendra Fadnavis राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पावसाचा जोरदार कहर सुरु आहे. अनेक भागांत पिकांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक गावांवर पूराचा वेढा आहे. प्रशासनाने लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे काम तातडीने सुरू केले आहे. नुकसानीचे पंचनामेही तत्परतेने सुरु असून, सर्व यंत्रणा जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात काम करत आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट माहिती दिली आहे.
मदतीसाठी तत्पर
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, मराठवाड्यात एका दिवसात ११३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यामुळे काही ठिकाणी जणावरांच्या चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना जणावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारने आधीच २००० कोटी रुपयांची मदत रक्कम जाहीर केली असून, त्याचे वाटप लवकरात लवकर सुरू केले जात आहे. पावसानं प्रभावित झालेल्या घरांना तातडीने १० हजार रुपयांची मदत दिली जात आहे.सरकारने लोकांसाठी राशन किटचे वाटप देखील सुरू केले असून, नागरिकांना कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री म्हणाले, “मी जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, खालची यंत्रणा योग्य प्रकारे काम करत आहे का हे लक्षात घ्या. काही ठिकाणी पूरामुळे विसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आधी लोकांना सुरक्षित स्थळी हलवणे अत्यंत गरजेचे आहे.”
फडणवीसांनी सांगितले की, आजचा आणि उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा असून, प्रशासन अलर्ट मोडवर राहून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काम करत आहे. पुढील दोन-तीन दिवस राज्यभर सतर्कता वाढवून कोणत्याही प्रकारची हानी टाळण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था केली जात आहे.मुख्यमंत्री म्हणाले, “सरकार जास्तीत जास्त मदत पोहोचवण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न करत आहे. राज्यातील प्रत्येक नागरिक सुरक्षित राहील यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”राज्यातील अतिवृष्टीमुळे सध्या अनेक भागात पावसाचा जोर कमी झालेला नसून, प्रशासन आणि हवामान विभागाची सतत निगराणी सुरू आहे. नागरिकांनी सुद्धा शासनाच्या सूचना काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
रेड अलर्ट... 48 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीचा हाहाकार सुरू आहे. अनेक भागांत पाऊस इतका जोरदार आहे की, शेतकरी आपले पिक गमावत आहेत. शेतांचे स्वरूप आता तळ्यात बदलले असून, अनेक ठिकाणी पिकं पूर्णपणे वाहून गेल्याचे चित्र समोर येत आहे. फक्त पिकांचे नुकसान नाही तर पुरामुळे धान्य, कपडे आणि घरगुती सामानही वाहून गेले असून, शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहिलेली नाही. आभाळ फाटल्यासारखा पाऊस सतत सुरू असल्याने सध्या राज्यात चिंता व्यक्त केली जात आहे.
मराठवाडा विभागात पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून, प्रशासनाने अनेक भागात रेड अलर्ट जारी केला आहे. शासनाने या गंभीर परिस्थितीत त्वरित मदत जाहीर केली असून, आपत्कालीन यंत्रणा कार्यरत आहेत. तरीही हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही आणि पुढील काही तास अत्यंत धोकादायक ठरू शकतात. पुढील ४८ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासन सतर्क आहे.भारतीय हवामान विभागाने उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात देखील रेड अलर्ट जारी केला असून, या भागांतही पुढील काही दिवस पावसाचा जोर राहणार आहे. मराठवाड्यात येणाऱ्या २४ तासांत पाऊस कमी होण्याची शक्यता असली तरी पूर्णपणे थांबणार नाही, असे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. पाणी पातळी सातत्याने वाढत असल्याने नदी, नाले आणि ओढे तुडुंब भरले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने अनेकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
पुणे हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी या अतिवृष्टीमागील कारणही सांगितले आहे. त्यानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या वादळी पावसाचा मोठा परिणाम महाराष्ट्रात दिसून येत आहे.
जालन्यातील heavy rainfall सोमनाथ परिसरात अतिवृष्टीमुळे खरिपातील सोयाबीन, कपाशी यांसारख्या महत्वाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतात पाणी साचलेले असून, काढणीसाठी आलेल्या पिकांमध्ये कोंब फुटण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. शेतकरी आता पंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.राज्याच्या यंत्रणा या सर्व संकटांवर लक्ष ठेवून आहेत आणि आवश्यक ती मदत पुरवण्यासाठी तत्पर आहेत. शेतकऱ्यांसाठी धान्य किटचे वाटप सुरू असून, पाण्याच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परिस्थिती अजूनही गंभीर असून, नागरिकांनी शासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.
मराठवाड्यातील लोकांसाठी पुढील काही दिवस आव्हानात्मक असणार आहेत, मात्र प्रशासन आणि हवामान विभागाच्या सतर्कतेमुळे मोठ्या आपत्तीचा सामना करण्याची तयारी आहे.
.