वर्धा,
NSS pre-selection camp महाराष्ट्रातील विविध विभागांमधील १६ विद्यार्थी व ३ कार्यक्रम अधिकारी हे कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) तर्फे आयोजित राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथक संचालनाच्या पूर्व निवड चाचणी शिबिरात सहभागी झाले आहेत. या संघाचे नेतृत्त्व शिक्षण संचालनालय पुणे तर्फे रासेयो +२ स्तर सहाय्यक विभागीय समन्वयक तथा जिल्हा समन्वयक प्रा. रवींद्र गुजरकर यांच्या नेतृत्वात होत असून, या शिबिरासाठी कोल्हापूर विभागाचे प्रा. धर्मराज राऊत व मुंबई विभागाच्या डॉ. भारती तोरणे, नागपूर विभागाचे जिल्हा समन्वयक प्रा. विवेक देशमुख, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन कापगते व प्रा. किशोर धांदे यांचे विशेष सहकार्य लाभले.
या शिबिरात मुलींमध्ये लातूरची साक्षी गोरे, मुंबईच्या आयुषी झा व विद्या राज, नागपूरच्या हर्षदा केवटे व अक्षरा माथरे, कोल्हापूरच्या आदिती पत्की व साक्षी पाटील, नाशिकची नंदिनी धात्रक तर अमरावतीची सोनम चव्हाण यांचा समावेश आहे. मुलांमध्ये नाशिकचा प्रथमेश आहेर, अमरावतीचा पियुष हूरकुंडे, मुंबईचा भूषण राजभोज व प्रसाद तुपे, लातूरचा संजय जाधव, नागपूरचे यश साटोणे व विशाल बनसोड यांची निवड झाली आहे. या शिबिरामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षणाकरिता संधी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्ती, संचलन कौशल्य व शिस्त यांचा कस या शिबिरात पाहिला जात आहे.
शिबिराच्या NSS pre-selection camp आयोजनाकरिता शिक्षण विभागाचे सहाय्यक संचालक दीपक माळी, विभागीय सहाय्यक संचालक (नागपूर) दिपेंद्र लोखंडे, रासेयो नागपूर विभागीय समन्वयक प्रा. विलास बैलमारे, मुंबई विभागीय समन्वयक प्रा. विनोद गवारे व कोल्हापूर विभागीय समन्वयक प्रा. राजेंद्र कोळेकर यांनी शुभेच्छा दिल्या. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, शिस्तबद्धता आणि देशभतीची भावना अधिक दृढ होऊन प्रजासत्ताक दिनी संचलनात सहभाग घेण्याची प्रेरणा लाभणार आहे.