अभिनेते महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता यांचे निधन

    दिनांक :28-Sep-2025
Total Views |
मुंबई
Deepa Mehta death ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या माजी पत्नी आणि प्रसिद्ध कॉस्ट्युम डिझायनर दीपा मेहता यांचे २५ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मांजरेकर कुटुंबावर शोककळा पसरली असून, कला व फॅशनविश्वातील अनेक मान्यवरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
 
 

Deepa Mehta death  
दीपा मेहता या एक नावाजलेल्या कॉस्ट्युम डिझायनर होत्या. “क्वीन ऑफ हार्ट्स” या त्यांच्या साड्यांच्या ब्रँडला फॅशन विश्वात मोठी लोकप्रियता लाभली होती. त्यांच्या डिझाईन्सना केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातून मागणी होती. अनेक कलाकारांनी त्यांच्या हातून साकारलेले पोशाख परिधान केले आहेत. त्यांची मुलगी अश्वमी मांजरेकर हिने देखील या ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं असून, आईच्या व्यवसायात तिनेही सहभाग घेतला होता.दीपांच्या निधनाची माहिती त्यांच्या मुलगा सत्या मांजरेकर याने सोशल मीडियावर Deepa Mehta death  भावनिक पोस्टद्वारे दिली. आईसोबतचा एक जुना फोटो शेअर करत त्याने लिहिले, “मी तुला मिस करतोय मम्मा.” या पोस्टमधून सत्या याचे आईप्रतीचे अतूट प्रेम आणि दु:ख स्पष्ट दिसून आले. त्याने इतरांनी शेअर केलेल्या श्रद्धांजलीच्या पोस्ट्सही आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर टाकत आपल्या दुःखाची भावना व्यक्त केली.
 
 
 
दीपा मेहता आणि महेश मांजरेकर यांचे लग्न १९८७ साली झाले होते. त्यांना सत्या आणि अश्वमी ही दोन मुले आहेत. मात्र काही वर्षांनंतर दोघांमध्ये विभक्त होण्याचा निर्णय झाला. घटस्फोटानंतर दोन्ही मुले दीपांसोबत राहत होती. तरीही त्यांचे वडील महेश मांजरेकर यांच्याशी त्यांचे संबंध सौहार्दपूर्ण होते. महेश मांजरेकर यांनी नंतर अभिनेत्री मेधा मांजरेकर यांच्याशी पुनर्विवाह केला.दीपा यांच्या जाण्याने केवळ कुटुंबीयच नव्हे, तर फॅशन आणि कलाक्षेत्रातील अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. ‘बिग बॉस मराठी ५’ फेम अभिनेत्री अंकिता प्रभू वालावलकर हिने सोशल मीडियावर लिहिले की, “एक मार्गदर्शक हरवला आहे. त्या फक्त आई नव्हत्या, तर एक प्रेरणा होत्या. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर साड्यांचा व्यवसाय उभा केला, हे अनेक मुलींसाठी प्रेरणादायी आहे.” तिने त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी अशी प्रार्थना केली आणि सत्या मांजरेकरप्रतीही सहवेदना व्यक्त केल्या.दीपा मेहतांचे अंत्यसंस्कार त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडले. त्यांच्या आठवणी, कामगिरी आणि दिलेल्या प्रेरणांचे स्मरण कायम राहील, असे अनेकांनी यावेळी नमूद केले.