‘स्वास्थ्यम’ची जीवनदायी ‘की-चेन ऑफ सर्व्हायव्हल’

    दिनांक :28-Sep-2025
Total Views |
नागपूर,
Nitin Gadkari एका छोट्याशा पण अत्यंत क्रांतिकारक उपक्रमाला आज सुरुवात झाली. ती म्हणजे ‘की-चेन ऑफ सर्व्हायव्हल’. ती दिसायला साधी असली तरी तिच्यात एक जीवनरक्षक उपाय दडला आहे. या की-चेनमध्ये अ‍ॅस्पिरिनची गोळी व हृदयविकार आपत्कालीन मदत क्रमांक (1800 210 3010) आहे. या संपूर्ण उपक्रमाच्या संकल्पनेमागील नाव म्हणजे स्वास्थ्यम सूपरस्पेशालिटी हॉस्पिटल्सचे संचालक व जेष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज हरकुट. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज या रुग्णालयास भेट देऊन संपूर्ण चमूचे कौतुक केले.
 
 

Nitin Gadkari  
स्वास्थ्यम सूपरस्पेशालिटी हॉस्पिटल व कोराझोन हेल्थकेअर फाऊंडेशनच्या टीम्सची भक्कम साथ असल्याचे सांगत डॉ. पंकज हरकुट म्हणाले की, दरवर्षी हजारो लोक अचानक हृदयविकाराच्या झटक्याने जीव गमावतात. अशी वेळ अचानक येते व नको ते अघटित घडून जाते. पण विचार करा... तुमच्या चाव्यांच्या की-चेन मध्येच तुमचा जीव वाचवण्याची ताकद असेल तर?
 
 
हृदयविकाराचा Nitin Gadkari  झटका आल्यावर प्रत्येक सेकंद अमूल्य असतो. अशा वेळी लगेच अ‍ॅस्पिरिन गोळी घेतल्याने हृदयावरचा ताण व हानी काही काळासाठी कमी करू शकते. मदत क्रमांकावर तात्काळ फोन केल्याने गोंधळ न होता वेळेत वैद्यकीय मदत पोहोचू शकते.या कल्पनेचं वैशिष्ट्य म्हणजे तिचे सोपेपण व सहज उपलब्धता. कोणत्याही वैद्यकीय प्रशिक्षणाशिवाय अगदी सामान्य माणूसही अशा प्रसंगी लगेच या की-चेनचा उपयोग करू शकतो. घरात, ऑफिस, प्रवासात कुठेही ही की-चेन तात्काळ मदतीचं बळ देते.स्वास्थ्यम कार्डियाकही क्लब सुरू करण्यात आला आहे. त्याअंतर्गत दर महिन्याला मोफत सत्रे घेतली जातील. त्यात मिळतील हृदय निरोगी ठेवण्याचे उपाय, आहार, पुनर्वसन यांविषयी तज्ज्ञांचे थेट मार्गदर्शन. हा केवळ उपचार नसून हृदय स्वास्थ्य जपण्याची संस्कृती उभारण्याचा हा प्रयत्न आहे.
 
 
आजच्या धावपळीच्या जीवनात ही छोटीशी की-चेन आपल्याला आठवण करून देते की, जीव वाचवण्यासाठी नेहमीच काही फार दिव्य करावे लागत नाही, कधी कधी छोट्याशा गोष्टीतही मोठी ताकद दडलेली असते.