फिरता फिरता
प्रफुल्ल व्यास
वर्धा,
Rajesh Bakane : जवळपास ११ महिन्यांपूर्वी देवळी विधानसभा क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला. २५ वर्षे आमदार असलेले रणजित कांबळे यांना धोबीपच्छाड करीत राजेश बकाने यांनी विजय खेचुन आणला. आमदार हे बिरूद लागण्यापूर्वी असलेला जनतेशी संवाद आणि संपर्क कायम ठेवत अत्याधुनिक जनसंपर्क कार्यालय देवळी येथे निर्माण झाले आहे.
गेल्या दोन दशकांत असा सक्रिय व दूरदृष्टी असलेला लोकप्रतिनिधी देवळीला लाभला नव्हता, अशी भावना नागरिकांनी व्यत केली. आ. बकाने यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास मतदार संघातील रस्ते चाळणी झाले आहेत. त्याचे खड्डे बुजवले तरी कार्यकर्ते आणि मतदारांचे समाधान होतं. आलेल्याला सांभाळणे हीच गरज आहे. पक्षाने तिकीट दिलं. निवडणूनही आणले. आता आपली जबाबदारी आहे. २५ वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यासाठी कसरत करावीच लागेल, असे आ. राजेश बकाने सांगतात.
नव्या कार्यालयात नागरिकांसाठी स्वतंत्र प्रतीक्षागृह, आरामदायी बैठक व्यवस्था आणि तक्रारी तत्काळ नोंदविण्याची यंत्रणा उपलब्ध आहे. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला समाधान देणे हीच या उपक्रमाची खरी ओळख ठरते. विशेष म्हणजे, आ. बकाने मायीकवरून थेट कर्मचार्यांना सूचना देण्याची डिजिटल पद्धत सुरू केली आहे. त्यामुळे आलेल्या तक्रारी आणि मागण्यांना तात्काळ न्याय मिळतो. आ. बकाने यांचं अत्याधुनिक कार्यालयात स्वतंत्र प्रतीक्षागृहात बसलेले नागरिक आपापल्या क्रमांकाची वाट पाहतात. पहिल्याची तक्रार ऐकून त्यावर तोडगा किंवा आलेल्याचे समाधान म्हणून मोबाईल स्पिकर ऑन करून अधिकार्यांसोबत संपर्क केला जातो. यात पोलिस स्टेशन संबंधीत तक्रारींची संख्या जास्त असते. या कार्यालयाची खासियत म्हणजे अडचणींना थेट स्पर्श. लोकांनी तक्रार लिहून दिली की तत्काळ नोंद, तातडीने संबंधित विभागाकडे पाठवली जाते.
गेल्या वीस वर्षांत देवळीला असा लोकाभिमुख आमदार लाभला नव्हता अशी प्रतिक्रिया आ. बकाने यांच्या ओपिडतअ आलेल्यांनी दिली. दरवाजा उघडा ठेवणारा नेता देवळीला प्रथमच मिळाल्याची मतदार संघात चर्चा आहे. यापूर्वीचे आमदार वाडा चिरेबंदीमध्ये असायचे. आता थेट आमदारासोबत बोलता येते. आमदारही आमच्या गावात येतात, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली.