रामकृष्ण वाघ कॉलेजमध्ये रासेयो स्थापना दिवस

    दिनांक :28-Sep-2025
Total Views |
नागपूर,
Raseo Foundation Day रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये रासेयोचा राष्ट्रीय स्थापना दिवस उत्साहात साजरा झाला. सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रा. अर्चना कहाळे पत्की यांनी जबाबदारीची जाणीव, तर प्रा. दीपक ठाकरे यांनी स्वातंत्र्यसैनिकांचा आदर्श मांडला. प्रा. स्वाती इंगळे व प्रा. हर्षल रोठे यांनी देशभक्ती, प्रामाणिकपणा व एकतेचे महत्त्व अधोरेखित केले.

१ २ ३ ४  
 
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. किरण पांडे यांनी, सूत्रसंचालन प्रा. मोहिनी सोनवाणे यांनी केले Raseo Foundation Day तर आभार प्रा. पल्लवी खंडारे यांनी मानले. विद्यार्थ्यांचा व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
सौजन्य:सायली पिदळी,संपर्क मित्र