संघटीत महिलांच्या शक्तीव्दारेच भारत महाशक्ती होणार

राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का

    दिनांक :28-Sep-2025
Total Views |
नागपूर,
Rashtra Sevika Samiti-Shantakka : राष्ट्र सेविका महिला अनेक क्षेत्रात कार्यरत असून युवापिढीला योग्य दिशा देण्याचे कार्य ती सक्षमपणे करीत आहे. ऑपरेशन सिंदूर मध्ये महिला शक्तीचे दर्शन घडले. अशाच संघटीत महिलांच्या शक्तीव्दारेच भारत महाशक्ती होईल, असा विश्वास राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी व्यक्त केला.
 
 
 
28-sep-17
 
 
 
राष्ट्र सेविका समिती, नागपूर महानगरच्या वतीने स्मृती मंदिर परिसर, रेशमबाग शस्त्रपूजा आणि विजयादशमी उत्सव प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रामुख्याने मुख्य अतिथी म्हणून पीजीएफएमच्या अध्यक्ष तसेच बीएलएओसीच्या उपाध्यक्ष सीए केमिशा सोनी, राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख कार्यवाहिका अन्नदानम सीता, नागपूर महानगर कार्यवाहिका करुणा साठे, रेणू जोशी आदी उपस्थित होते.
 
स्वदेशी वस्तू आणि स्वदेशी विचारांचा अवलंब करा
 
राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख शांताक्का पुढे म्हणाल्या, वसुधैव कुटुंबकम या तत्वाने भारताने जगाच्या कल्याणासाठी काम केले आहे. या नवरात्री उत्सवादरम्यान प्रत्येक महिलांनी स्वदेशी वस्तू आणि स्वदेशी विचारांचा अवलंब करण्याची प्रतिज्ञा घ्यावी. गौरवशाली भारताची निर्मिती करण्याच्या उद्देशाने डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. वैयक्तिक विकास, सामाजिक आणि संघटनात्मक विकासाचे कार्य अखंडपणे ठेवल्यामुळे आज संघाचे कार्य जगभरात दिसून येत आहे.
 
प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान
 
 
मुख्य अतिथी सीए केमिशा सोनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व क्षेत्रात महिला महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. आता भारताला विश्वगुरु होण्यासाठी राष्ट्र सेविका समितीच्या प्रत्येक महिला सदस्यांचे योगदान मोलाचे ठरणार आहे. विजयादशमीला राष्ट्रीय सेविका समितीची मध्ये स्थापना झाली संघासारखेच ध्येय आणि कार्यपद्धती घेऊन, राष्ट्रीय सेविका समिती ही एक स्वतंत्र महिला संघटना देशसेवेचे कार्य करीत आहे. भारताला विश्वगुरु होण्यासाठी राष्ट्रीय सेविका समितीच्या प्रत्येक महिलांचे योगदान मोलाचे ठरणार आहे.