सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाचा बॅडमिंटन विजय

    दिनांक :28-Sep-2025
Total Views |
नागपूर,
Sevasadan College सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाच्या निशिका हेमंत गोखे, आरती राजेंद्र सानसरोदे, आरुषी विनोद पांडे आणि मृण्मयी सत्येंद्र जोशी या विद्यार्थीनींनी उत्कृष्ट खेळ सादर करत म.न.पा. शालेय बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले.

ram 
 
 
(१९ वर्षांखालील मुलींच्या गटात) अंतिम फेरीत CPS काटोल रोड शाळेचा २-० ने पराभव करून विजेतेपद मिळवले. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी सांदीपनी विद्यालयाला २-० असा पराभव केला. Sevasadan College या विजयानंतर संस्थेच्या अध्यक्ष कांचन गडकरी, सचिव वासंती भागवत, पालक संचालक अमर कुळकर्णी, डॉ. कल्पना उपाध्याय, डॉ. मनीषा यमसनवार, प्राचार्य अजय चव्हाण व पर्यवेक्षक संदीप झाडे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.
सौजन्य:बाळकृष्ण सुरतने,संपर्क मित्र