यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, शेतीचे प्रचंड नुकसान

    दिनांक :28-Sep-2025
Total Views |
यवतमाळ,
तभा वृत्तसेवा
Yavatmal-Heavy rain-Agricultural damage :  
 
बोरी महसूल मंडळात अतिवृष्टी पिकांचे प्रचंड नुकसान
 
बोरी चंद्रशेखर, 
मागील आठवड्यापासून दोनदा मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावत ढगफुटीसदृश्य स्थिती निर्माण झाली. अनेक महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली होती. दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात या अतिवृष्टीमध्ये शेकडो हजार हेक्टरवरील शेती पाण्याखाली आल्याने . व अनेक गावातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरून जीवनावश्यक वस्तूंसह 10 जनावरे पुराच्या पाण्यात वाहून प्रचंड नुकसान झालेत. तसेच अनेक गावांना पुराच्या वेढ्याने अनेक मार्ग बंद झाले.
 
 
 
RAIN
 
 
 
सोयाबीन, तूर उडीद, मुंग, ज्वारी, ऊस, हळद, यासह अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दारव्हा तालुक्यातील अडाण धरणातील पाणीपातळी वाढल्याने नदीपात्रात गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रशासनाने तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतत त्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर वरील शेती पुराच्या पाण्याखाली आल्याने कापूस, सोयाबीन, तूर उडीद, मुंग, ज्वारी, ऊस, हळद, यासह अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
 
 
दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे शेती 90 टक्के पुराच्या पाण्याखाली आल्याने प्रशासनाकडून पिकांचे पंचनामे केले जात आहे. मात्र यावर कुठलीही तात्काळ मदत मिळत नाही, याकडे प्रशासनाने त्वरीत लक्ष देण्याची गरज आहे नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकèयांनी सरकारला केली आहे.
 
 
काही गावात घरांचे देखील नुकसान झाले आहे त्याची दखल प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी होत आहे. दारव्हा तालुक्यातील अनेक महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दारव्हा तालुक्यात दारव्हा बोरी खुर्द, हातगाव, जवळगाव, दहिफळ, सावळी, औरंगपुर, सैदानी, कंझरा खुर्द, कांझरा (बु), बोरी (बु) ब्रम्ही येथे अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
---------------------
 
हदगाव तालुक्यात पावसाचा कहर
 
पिकांचे प्रचंड नुकसान : जनजीवन विस्कळीत
तभा वृत्तसेवा
हदगाव, 
तालुक्यासह बरडशेवाळा, पळसा, मनाठा, बामणी फाटा परिसरात शनिवार, 27 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. सकाळपासून सतत कोसळणाèया मुसळधार पावसामुळे नदी, नाले व ओढ्यांनी धोक्याची पातळी ओलांडत शेतजमिनी व पिकांचे मोठे नुकसान केले.
 
 
याआधी झालेल्या पुरामुळे नदीकाठावरील पिके व जमिनी खरडून गेल्या होत्या. परंतु पुन्हा झालेल्या अतिवृष्टीमुळे उर्वरित चढावरील काढणीस आलेल्या सोयाबीनला कोंब फुटल्याने शेतकèयांची शेवटचीही आशा संपुष्टात आली आहे.
 
 
तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून राष्ट्रीय महामार्गावरील पळसा बरडशेवाळा दरम्यानच्या पुलाच्या एका बाजूला नवा तर दुसèया बाजूला जुना पूल असल्याने शेतकèयांच्या शेतीसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तहसीलदार सुरेखा नांदे आणि मनाठाचे पोलिस निरीक्षक विलास चवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाèयांना तातडीने पाचारण करून आवश्यक सूचना दिल्या.
 
 
दरम्यान, बरडशेवाळा, बामणी फाटा दरम्यान रेल्वेचे अर्धवट काम सुरू असल्याने परिसरातील शेते पाण्याखाली गेली आहेत. शेतातील साहित्य व पिकांचे मोठे नुकसान झाले असून रुस्तुम मस्के यांच्या जनावरांनादेखील पुराच्या पाण्यात अडकण्याची वेळ आली.
हदगाव शहरातही गंभीर स्थिती
 
 
शहरातील अनेक रस्त्यावर पाणी साचले होते. विविध वॉर्डांमध्ये नाल्यांची तुंबलेली स्थितीमुळे पाणी रस्त्यावर आले होते. सकाळपासून पाण्याचा जोर वाढत गेल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. खासदार आमदार व इतर लोकप्रतिनिधींनी ठिकठिकाणी जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
--------------------
 
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकèयांना तत्काळ नुकसान भरपाई द्या
 
अन्यथा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
 
तभा वृत्तसेवा
झरी जामनी, 
मागील अनेक दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी वर्ग अहवाल दिल झाला असून शेतकèयांची हातात येणाèया सोयाबीन कापूस पिकांची पूर्णता नुकसान झाली आहे तेव्हा शेतकèयांना एकरी 50 हजार रुपयाची अनुदान तात्काळ द्या, अशी मागणी तहसीलदार अक्षय रासने यांच्यामार्फत जिल्हाधिकाèयांना महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस विभागीय अध्यक्ष तथा अध्यक्ष वसंत जिनिंग फॅक्टरीचे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांनी केली आहे.
 
 
 
शेतकèयांना एकरी रुपये 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावे व शेतीवरील संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अन्यथा खडकी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून दिला. यावेळी राजीव कासावार, राजु येल्टीवार, विभागीय अध्यक्ष जि.म. बैंक यवतमाळ राहुल दांडेकर, युवक कॉग्रेस अध्यक्ष वणी नीलेश येल्टीवार, अध्यक्ष सरपंच संघटना झरी गिरीधर उईके, जि.प. सदस्य शेखर बोनगिरवार, डॉ. मासीरकर, भुमारेड्डी बाजलवार, प्रकाश मॅकलवार, विनोद गोडे, सुनील ढाले, सुरेन्द्र गेडाम, गणेश बोलेकार, प्रशोत बगेले, सचीन टाले, राजू उपरे, संतोष कोहळे, मधु भोयर, दत्ता परचाके आणि काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.