तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
DPR submission पश्चिम विदर्भाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेला आणि वर्धा-नांदेड रेल्वेमार्गाला जोडणारा यवतमाळ-मुर्तिजापूर ब्रॉडगेज प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. या प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) मध्य रेल्वेकडूननोव्हेंबर अखेरीस रेल्वेबोर्डाकडे सादर होणे अपेक्षित आहे.फिल्ड आणि ट्रॅफिक सर्वेक्षण पूर्ण झाले असून संरेखन अंतिम झाले आहे. ऑपरेटिंग विभागाशी समन्वय करून स्टेशन यार्ड प्लॅन तयार केले आहेत आणि अंतिम रूप दिले जात आहे. अंदाजित खर्चाचा अहवाल बनवणे सुरू असून डीपीआरचा मसुदा तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
रेल्वे बोर्डाला डीपीआर सादर करण्याची अपेक्षित तारीख नोव्हेंबर 2025 आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून शकुंतला रेल्वे विकास समितीचे समन्वयक अक्षय पांडे यांना मिळाली आहे. माहिती अधिकारांतर्गत ही माहिती प्राप्त झाली आहे.मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या शकुंतला रेल्वे विकास समितीच्या आंदोलनाचा आणि पाठपुराव्याचा उल्लेख राज्यसभेत खासदार अनिल बोंडेंनी केला होता. समितीच्या तांत्रिक पाठपुराव्यामुळे फेब्रुवारी 2024 मध्ये राज्य शासनाने 50 टक्के आर्थिक सहभागाची घोषणा यवतमाळ-मुर्तिजापूर ब्रॉडगेज प्रकल्पासाठी केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीही या प्रकल्पासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंसोबत बैठक आयोजित केली होती. यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये एफएलएस सर्वेक्षण मंजूर झाले होते. हे सर्वेक्षण मध्य रेल्वेकडून आता पूर्ण करण्यात आले आहे. कॅबिनेट कमिटीची अंतिम मंजुरी मिळण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल विविध स्तरांवरून मंजुरीसाठी पुढे जात असतो. यासाठी वित्त विभाग, नीती आयोगाची मंजुरी घ्यावी लागते. यानंतर रेल्वे बोर्डाकडून मंत्रिमंडळ समितीपुढे प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात येतो. हे सर्व टप्पे बाकी असल्यामुळे, याला एक-दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे.
अनेक दशकांपासून धीम्या गतीने सुरू असलेल्या या कामाला आता मूर्त रूप प्राप्त होताना दिसत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याची भाग्यरेखा ठरणारा हा महत्वपूर्ण प्रकल्प राज्य शासनाने प्राधान्याने प्रस्तावित करावा, अशी मागणी शकुंतला रेल्वे विकास समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुर्तिजापूर-यवतमाळ रेल्वेमार्गासाठी आजपर्यंत सर्वपक्षीय संसद सदस्यांनी पाठपुरावा केला आहे. खासदार संजय देशमुख यांनीही नुकतीच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आहे.
राज्याने अधिक सक्रिय होण्याची गरज
गेल्या 60 DPR submission वर्षांपासून शकुंतला ब्रॉडगेजसाठी केंद्र सरकारकडे सर्व स्तरावरून पाठपुरावा सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दोन वेळा रेल्वेमंत्र्यांना याबाबत पत्र पाठवले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूममधून हा प्रकल्प मॉनिटर होणे आवश्यक आहे. सर्वाधिक मागणी होणाèया या प्रकल्पाला अंतिम मंजुरी केव्हा मिळते, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अक्षय पांडे,
समन्वयक, शकुंतला रेल्वे विकास समिती