समाजाच्या कल्याणासाठीच माझ्या मंत्रीपदाचा उपयोग

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आणा

    दिनांक :29-Sep-2025
Total Views |
नागपूर,
Chandrashekhar Bawanakule माझ्या पाच वर्षाच्या मंत्रीपदाचा उपयोग मी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरिता करण्यासाठी कटिबद्ध मात्र, केंद्र आणि राज्य सरकारचा जास्तीत जास्त निधी आपल्या भागात योग्य पद्धतीने विकास कामांवर खर्च करायचा असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे सर्व सदस्य, नगराध्यक्ष मोठ्या मताधिक्याने निवडून आणा, आवाहन राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बीडगाव नगरपंचायत येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात सर्वसामान्यांचे जीवन सुकरबावनकुळे पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेली मते ही कर्ज म्हणून स्वीकारले आहे. त्यामुळे पाच वर्षे विकास कामांच्या माध्यमातून हे कर्ज फेडण्याचे काम मी करील. आमचे सरकार लोक कल्याणकारी सरकार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जीवनाश्यक वस्तूंवरील कर २८ टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणला.
 

 Chandrashekhar Bawanakule 
आता सर्वसामान्यांचे जीवन सुकर होणार आहे. आपण भाजपला दिलेले मत किती महत्त्वाचे आहे, याचा प्रत्यय आपल्याला आला असेल. जे वचन आम्ही विधानसभा निवडणुकीत दिले होते, ते पूर्ण करणार आहोत. घर नाही त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे दिली जाणार आहेत. लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही, शेतकर्‍यांना दिवसा आठ वीज आणि कर्जमाफी करण्याचा शब्द आम्ही पाळणार आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला बहुमताने विजयी करा, या भागात विकास निधी आणण्याची जबाबदारी माझी आहे. आपला नगराध्यक्ष निवडून आला, तर योग्य पध्दतीने विकास कामे होतील. निवडणूक हरल्यावर आरोप करण्याची काँग्रेसच्या नेत्यांची परंपरा आहे. आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. हिंमत असेल स्थानिक काँग्रेस नेत्यांनी निवडणूक लढवावी. भाजपचे जनतेचे सेवक मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करत यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन कार्यकर्त्यांना यावेळी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
 
 
 
अतिवृष्टीनंतर आता पंचनामे सुरु

प्राथमिक अंदाजानुसार ३४१० हेक्टर क्षेत्रावर नुकसान
कळमेश्वर तालुक्यातील व धापेवाडा मंडळातील गावांमध्ये २६ सप्टेंबरला आलेल्या व अतिवृष्टीमुळे मुख्यतः तिडंगी,तिष्टी(खु),तिष्टी(बु), तेलगांव , दाढेरा , मांडवी या गावांमध्ये शेतीपिकाचे व संत्रा बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे.जिल्हा महसूल प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या आदेशानुसार तातडीने पंचनामे सुरू केले आहेत.गेल्या २ दिवसापासुन युध्दपातळीवर पंचनामे सुरू आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ३४१० हेक्टर नुकसान झाले आहे .नुकसान झालेल्या सर्व नुकसान भरपाई मिळावी कोणीही नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये याची दक्षता तालुका प्रशासन घेत आहे.