हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात ‘रेबिज’ची लसच नाही

रुग्णांच्या नातेवाईकांची लसीसाठी वर्धा, नागपूरकडे धाव

    दिनांक :29-Sep-2025
Total Views |
हिंगणघाट,
rabies vaccine येथील उपजिल्हा रुग्णालयाचे अजिबोगरीब कारभाराचे पुन्हा एक प्रकरण समोर आले आहे. श्वानाने बालकाच्या डोयाचा चावा घेतल्यानंतर रुग्णालयात आणलेल्या बालकाला देण्यात येणारे एचआरआयजी नावाचे इंजेशनच उपलब्ध नसल्याने नातेवाईकांची चांगलीच धावपळ झाली. या इंजेशनसाठी वर्धा किंवा नागपूर येथे जावे लागत असल्याचा धकादायक प्रकार पुढे आला आहे.
 

rabies vaccine 
येथील ज्ञानेश्वर वार्डातील नक्ष संदीप प्रजापती या ७ वर्षीय बालकावर भटया श्वानाने हल्ला केला. चिमुकल्याच्या डोयाचा कडकडून चावा घेतल्याने सदर मुलाला आई -वडिलांनी लगेचच सरकारी दवाखान्यात आणले. परंतु, नेहमीप्रमाणे या रुग्णालयात डॉटरांनी सदर इंजेशन आमच्या दवाखान्यात उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णाला सेवाग्राम येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. सेवाग्राम रुग्णालयातमध्ये जाण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. शेवटी, पालकांना खाजगी वाहन करून सेवाग्रामला यावे लागले सोबतच ११ हजार रुपयाचे इंजेशन घ्यावे लागले. त्यामुळे या कुटुंबाला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाला जबाबदार कोण, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
दुसरीकडे नगर परिषदेची rabies vaccine अजबच तर्‍हा आहे. त्यांच्याकडे बेवारस श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली असता नप अधिकारी बेपर्वाईने वन्य जीवरक्षक राकेश झाडे यांना आम्ही पाठवतो, असे बेजबाबदार उत्तरे देतात. राकेश झाडे हा हौस म्हणून जखमी पाळीव प्राण्यांना मदत करतो. त्यांची व्यवस्था व्यवस्थितपणे जनतेच्या मदतीने करीत असतो. तो नगरपरिषदेचा कर्मचारी नाही. नगरपरिषद झाडे यांना काही मानधन देत नाही. मग त्यांच्यावर नपची जबरदस्ती का? नपजवळ कर्मचारी असून सुद्धा ते आपली जबाबदारी दुसर्‍यांवर ढकलून स्वत:ची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहे.
वरिष्ठांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूरज कुबडे यांनी केली आहे.