मुंबई,
Ahaan Panday 2025 च्या दुसऱ्या सहामाहीत बॉलिवूडमध्ये अपेक्षेप्रमाणे फारशा मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची कमतरता जाणवत असतानाही, मोहित सूरी दिग्दर्शित ‘सायरा’ने बॉक्स ऑफिसवर जे यश मिळवले, त्याने संपूर्ण उद्योगाचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता अहान पांडे आणि अभिनेत्री अनीत पड्डा यांनी आपल्या अभिनयाची ठसठशीत छाप सोडली. विशेष म्हणजे, मोठ्या प्रमोशन्सशिवाय प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरातून तब्बल ५६९ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
या अनपेक्षित यशानंतर अहान पांडेच्या करिअरने खऱ्या अर्थाने वेग घेतला आहे. आता त्यांनी यशराज फिल्म्सच्या (YRF) बॅनरखाली आणखी एक मोठा प्रोजेक्ट साईन केला आहे. हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत अली अब्बास जफर – ‘सुलतान’ आणि ‘टायगर जिंदा है’ यांसारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शक. हा नवा चित्रपट एक अॅक्शन-रोमॅन्स शैलीतील असेल, ज्यामध्ये केवळ रोमान्सच नाही तर दमदार ड्रामा आणि थरारक अॅक्शन सीन्स असतील, अशी माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ‘सायरा’मध्ये अहान पांडे यांची अभिनयक्षमता पाहून अली अब्बास जफर प्रभावित झाले होते. विशेषतः अहानचे इमोशनल आणि ड्रामेटिक सीन पाहून त्यांनी त्यांच्याबद्दल सकारात्मक मत व्यक्त केले. यानंतर आदित्य चोप्रा यांनी अली अब्बास जफरसमोर अहानचे नाव सुचवले आणि त्यावर दोघांची सहमती झाली. ‘सायरा’च्या यशानंतर प्रेक्षकांमध्ये अहानच्या पुढील प्रोजेक्टबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती, जी आता या नव्या घोषणेमुळे अधिक वाढली आहे.
या चित्रपटाच्या स्क्रिप्टचे काम पूर्ण झाले असून, सध्या संगीताच्या बैठका सुरू आहेत. चित्रपटाच्या चित्रीकरणाला २०२६ च्या सुरुवातीस सुरुवात होणार असल्याचे वृत्त आहे. अली अब्बास जफर आणि आदित्य चोप्रा यांची ही एकत्रित पाचवी कलात्मक निर्मिती असणार आहे.
YRF कडून Ahaan Panday अहान पांडेवर घेतला गेलेला हा विश्वास केवळ त्यांच्या अभिनय कौशल्यावर आधारित नाही, तर नव्या पिढीतील कलाकारांमध्ये त्यांच्यातील स्टार क्वालिटीच्या शक्यतांवरही आहे. ‘सायरा’च्या माध्यमातून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून, आता या नव्या अॅक्शन-रोमॅन्स चित्रपटात त्यांच्याकडून अधिक घनदाट आणि शक्तिशाली अभिनयाची अपेक्षा ठेवली जात आहे.
बॉलिवूडमध्ये नवोदित कलाकारांसाठी संधींचा अभाव असतानाच, अहान पांडे यांना मिळालेल्या या सुवर्णसंधीमुळे त्यांच्यावर सध्या संपूर्ण इंडस्ट्रीचे लक्ष केंद्रित झाले आहे. आता प्रेक्षकांना वाट पाहायची आहे ती या चित्रपटाच्या अधिकृत घोषणांची आणि अर्थातच, मोठ्या पडद्यावर अहानचा नवा अॅक्शन अवतार पाहण्याची.