मुंबई,
Aryan Khan बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यांच्यासाठी मागील काही वर्षे फारशी यशस्वी ठरली नव्हती, पण ‘पठाण’च्या प्रचंड यशानंतर त्यांच्या करिअरने पुन्हा भरारी घेतली. आता त्यांचा मुलगा आर्यन खान यानेदेखील आपल्या पहिल्याच प्रोजेक्टद्वारे धमाकेदार एंट्री केली आहे. ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘बैड्स ऑफ बॉलिवूड’ या सिरीजमुळे आर्यनने दिग्दर्शक म्हणून आपल्या प्रवासाची सुरुवात केली असून, या सिरीजचे प्रेक्षक आणि समीक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे.
सात भागांच्या या सिरीजने केवळ आपल्या विषयवस्तूमुळेच नाही, तर त्यामधील तगड्या स्टारकास्ट आणि आकर्षक कैमियोजमुळेही प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या सिरीजमध्ये तब्बल ५० हून अधिक सेलिब्रिटी कैमियोज आहेत, ज्यामध्ये शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, रणवीर सिंग, राजकुमार राव, अरशद वारसी, सारा अली खान, इमरान हाशमी आणि इतर अनेक लोकप्रिय कलाकारांचा समावेश आहे.विशेष म्हणजे, या सिरीजमुळे आर्यनने आपल्या वडिलांचा १८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. शाहरुख खान यांच्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटामध्ये ३० ते ३२ स्टार्सचे कैमियो होते, आणि तोपर्यंत तोच सर्वाधिक कैमियोज असलेला हिंदी चित्रपट मानला जात होता. परंतु आता ‘बैड्स ऑफ बॉलिवूड’ने हा विक्रम मागे टाकत ५० पेक्षा अधिक सेलिब्रिटी कैमियोजचा विक्रमी आकडा गाठला आहे.
सिरीजच्या Aryan Khan दिग्दर्शनाची जबाबदारी स्वतः आर्यन खानने सांभाळली असून, निर्मितीची धुरा गौरी खान यांनी उचलली आहे. सिरीजचे संगीत लोकप्रिय संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे. प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादामुळे सिरीजच्या दुसऱ्या सिझनची चर्चा सध्या जोमात सुरू आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सिरीजचा पहिला भाग संपताच, दुसऱ्या भागाबद्दल उत्सुकता वाढली आहे.
शाहरुख खान Aryan Khan यांच्या कुटुंबासाठी हे यश विशेष महत्त्वाचे आहे. आर्यनने आपली कारकीर्द दिग्दर्शनाने सुरू करत स्वतःची ओळख निर्माण केली आहे, आणि आता शाहरुख स्वतः आपल्या मुलीला – सुहाना खानला – मोठ्या पडद्यावर लॉंच करण्याच्या तयारीत आहेत. ‘किंग’ या आगामी चित्रपटामध्ये बाप–मुलगी एकत्र दिसणार असून, या चित्रपटाचे शूटिंग सध्या सुरू आहे.आर्यन खानच्या या सशक्त पदार्पणाने केवळ खान कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण बॉलिवूडचा एक वेगळा टप्पा सुरू झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अभिनयाच्या पलीकडे जाऊन दिग्दर्शन आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून आर्यनने दाखवलेली गुणवत्ता पुढील काळात त्याला मोठ्या यशाकडे घेऊन जाणार, अशी अपेक्षा सिनेसृष्टीत व्यक्त होत आहे.