बिहार निवडणूकीसाठी भाजपाची १९ नेत्यांची विशेष टीम!

    दिनांक :29-Sep-2025
Total Views |
पाटणा,
BJP's special team for Bihar भारतीय जनता पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवताना मोठा निर्णय घेतला आहे. जाहीरनामा समिती स्थापन केल्यानंतर आता भाजपाने राज्य निवडणूक समिती स्थापन केली असून, या समितीत एक पदसिद्ध सदस्य, तीन विशेष निमंत्रितांसह एकूण १९ नेत्यांचा समावेश केला आहे. या टीममध्ये डॉ. दिलीप कुमार जयस्वाल, सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा, राधा मोहन सिंह, गिरीराज सिंह, नंद किशोर यादव, नित्यानंद राय, मंगल पांडे, डॉ. संजय जयस्वाल, भिखुभाई दलसानिया, रविशंकर प्रसाद, रेणू देवी, प्रेम कुमार, जनक चमार आणि प्रेम रंजन पटेल यांचा समावेश आहे. धर्मशिला गुप्ता पदसिद्ध सदस्य म्हणून, तर विनोद तावडे, दीपक प्रकाश आणि नागेंद्र जी विशेष निमंत्रित म्हणून समितीत सहभागी आहेत.
 
 

dssffghhjj  
भाजपने निवडणूक प्रचारासाठी स्वतंत्र ४५ सदस्यीय समितीही स्थापन केली आहे, BJP's special team for Bihar ज्यात केंद्रीय आणि राज्य मंत्री, खासदार, आमदार, माजी खासदार आणि वरिष्ठ संघटना नेते यांचा समावेश आहे. या समितीचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष डॉ. दिलीप कुमार जयस्वाल असतील. पक्षाने समिती तयार करताना सामाजिक आणि प्रादेशिक समतोल राखण्याकडे विशेष लक्ष दिले आहे. निवडणूक समितीची मुख्य जबाबदारी प्रचार धोरण तयार करणे, त्याची बूथ पातळीपर्यंत प्रभावी अंमलबजावणी करणे, केंद्रीय नेतृत्वातील वरिष्ठ नेत्यांच्या बिहार दौऱ्यांचे समन्वय करणे आणि प्रचाराचे व्यवस्थापन करण्याचे आहे. पक्षाचे प्राथमिक लक्ष विकास आणि सुशासनावर असून, एनडीएसोबत युती करून पूर्ण बहुमताच्या सरकाराची स्थापना करणे हे भाजपाचे अंतिम ध्येय आहे.