चंद्रपूर,
Chandrapur tallest girl, जगात दुसर्या क्रमांकाची ठेंगणी मुलगी चंद्रपूर जिल्ह्यात आढळली आहे. दोन फूट तीन इंच एवढी तिची उंची आहे. त्यामुळे तिची नोंद आता ‘इंटरनॅशन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. ज्ञानेश्वरी दुणेदार असे तिचे नाव असून, ती ब्रम्हपुरी तालुक्यात परसोडी येथील रहिवासी आहे.
अलंकार सावळकर व योगेश गोखरे या युवकांना ती रस्त्याच्या कडेला चालताना दिसली. तिची उंची बघून त्यांना आश्चर्य वाटले. तिची विचारपूस केली गेली गेली आणि माहिती घेऊन उंची मोजली. तेव्हा लक्षात आले की, जिवंत असलेल्या व्यक्तींमध्ये तिची उंची जगात दुसर्या क्रमांकाची आहे. त्यामुळे तिची कुठेतरी नोंद व्हायला हवी आणि तिला ओळख प्राप्त व्हावी, या उद्देशाने त्या युवकांनी विश्व विक्रमांची नोंद करणार्यांकडे कागदोपत्री पाठपुरावा केला. त्यात त्यांना यश मिळाले. तिची नोंद जागतिक संस्थेने घेत तिला प्रमाणपत्र बहाल केले. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरीला हे प्रमाणपत्र देण्यात आले. ज्ञानेश्वरीला याची कल्पना नव्हती की, ती जगातील दुसर्या क्रमांकाची ठेंगणी मुलगी आहे.