शेतकर्‍यांच्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू करणार: आ. डहाके

कारंजा बाजार समितीची वार्षिक आमसभा उत्साहात

    दिनांक :29-Sep-2025
Total Views |
कारंजा लाड, 
mla dahake शेतकरी हा समितीचा केंद्रबिंदू असून, कृषी उत्पादनासाठी परिश्रम करणार्‍या शेतकर्‍यांना योग्य भाव, वेळेवर देयक आणि सुरक्षित व्यवहार मिळणे हीच खरी प्रगती आहेद्य शेतकर्‍यांच्या पाल्यासाठी कारंजा बाजार समितीमार्फत स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने अभ्यासिका सुरू करण्यात येईल आणि तालुयातील शेतकर्‍यांना चियासिड्स साठी बाजारपेठ कारंजा बाजार समिती उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन आमदार तथा सभापती सई डहाके यांनी केले.
 
 

शेतकारी  
 
 
स्थानिक कृषी अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू ठरणार्‍या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण आमसभा २९ सप्टेंबर रोजी शेतकरी निवास येथे उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार तथा बाजार समितीच्या सभापती सई डहाके होत्या, तर उपसभापती प्रकाश लिंघाटे, सचिव निलेश भाकरे यांच्यासह सर्व संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. आमसभेत बाजार समितीच्या मागील वर्षातील आर्थिक आढावा सादर करण्यात आला. कृषी मालाची खरेदी-विक्री व्यवस्था अधिक सुलभ करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर, शेतकर्‍यांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी ई-नाम व्यवहाराची गती वाढवणे, वजन काट्यांची अचूकता, तसेच गोदाम आणि हॉलसुविधा सुधारण्याचे प्रस्ताव सभेत मांडण्यात आले.सचिव निलेश भाकरे यांनी समितीच्या उत्पन्न-खर्चाचा सविस्तर अहवाल मांडला. त्यावर सदस्यांनी सूक्ष्म चर्चा करत शेतकरी हिताच्या दृष्टीने विविध सूचना दिल्या. सभेला कारंजा तालुक्या .'तील विविध भागांतून शेकडो शेतकरी उपस्थित होते.
आपल्या हंगामी पिकांच्या विक्रीदरम्यान येणार्‍या अडचणी, थकबाकी व तातडीच्या कर्जसुविधा यांसारख्या प्रश्नांवर त्यांनी प्रत्यक्ष चर्चेत भाग घेतला. अनेक शेतकर्‍यांनी समितीच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यातील विकासकामांना पाठिंबा दर्शविला. उपसभापती प्रकाश लिंघाटे यांनीही बाजार परिसराच्या सुधारणा व सुविधा विस्तारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.सभेच्या शेवटी डिजिटल तोल काटे अद्ययावत करणे, तसेच शेतकर्‍यांना ई-नाम प्रशिक्षण शिबिरे घेण्याचे ठराव मंजूर करण्यात आले. आ. सई डहाके यांच्या नेतृत्वाखाली समितीने घेतलेले ठोस निर्णय कारंजा व परिसरातील शेतकर्‍यांना नवा आत्मविश्वास देणारे ठरतील, असा विश्वास यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आला.