गडचिरोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा : डॉ. देवराव होळी

    दिनांक :29-Sep-2025
Total Views |
गडचिरोली,
dr devrao holi गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी झालेल्या सततच्या व मुसळधार पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून उदरनिर्वाहाचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. या पृष्ठभूमीवर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करून गडचिरोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
 

आमदार होळी  
 
 
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांच्या पिकांवर आलेल्या संकटामुळे तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे.dr devrao holi शासनाने त्वरीत ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत जाहीर करावी. शासनाने तातडीने मदत जाहीर करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशीही मागणी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली आहे. यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम आदी उपस्थित होते.