वर्धा,
farmers protest Wardha अतिवृष्टीमुळे शेतातील सर्व पिकांचे तसेच चारकोल रॉट व येलो मोझक रोगाने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुसरीकडे केंद्र सरकारने कापूस, तूर, कडधान्यावरील आयात शुल्क पुर्णतः संपवून विदेशातून मोठ्या प्रमाणात आयात करून पिकांचे भाव पाडले आहे. शेतकर्यांवर दुहेरी संकट आले आहे. या विरोधात शेतकरी संघटनेच्या वतीने आज २९ रोजी हिंगणघाट, समुद्रपूर, देवळी येथे शेतकरी संघटना तर पुलगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
समुद्रपूर : शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून एन.डी.आर.एफ.चे निकष बाजूला सारून अती पावसाने व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची ५० हजार रुपये हेटरी मदत तात्काळ जाहीर करावी, निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार ७/१२ कोरा करावा, सिसिआयला कापूस विक्रीसाठी नोंदणीची बाजार समित्यांमध्ये, खरेदी सेंटरवर कापूस खरेदी सुरू असे पर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू ठेवावी, शेतकर्यांना पीक कर्जासाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी लादलेली सिबील स्कोअरची अट रद्द करावी, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते रवी काशिकर, माजी आमदार सरोज काशिकर, उल्लास कोटमकर, डॉ. हेमंत ईसनकर, आदींसह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी संख्येने उपस्थित होते.
हिंगणघाट : शेतकर्यांना हेटरी ५० हजार रुपये मदत जाहीर करावी अशी मागणी स्वभापचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे यांनी केली. मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकार्यांना देण्यात आले. आंदोलनात हेमराज ईखार, बाबाराव दिवांजी, गणेश मुटे, पुंडलिक हुडे, अभिजित लाखे, प्रकाश सेनाड, किशोर धोटे, आदी सहभागी झाले होतेपुलगाव : येथे महाविकास आघाडीने जनआक्रोश मोर्चा काढला. मोर्चात परिसरातील शेतकरी बैलगाडी घेऊन सहभागी झाले. जनआक्रोश मोर्चा स्टेशन परिसरातील तिलक चौकातून सुरुवात होऊन इंदिरा चौक, गांधी चौक, भगतसिंग चौक मार्गे तहसील कार्यालयात पोहोचला. मोर्चाचे नेतृत्व पुलगावचे माजी नगराध्यक्ष मनीष साहू, शिवसेना (उद्धव) चे जिल्हाध्यक्ष आशिष पांडे, अॅड. विद्याधर माथने, शिवसेना अध्यक्ष संदीप कूचे, सरपंच व शेतकरी प्रमोद बीरे, आदींनी केले.
देवळी : शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकर्यांच्या विविध मागण्यासाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार क्षीरसागर साहेब यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात शेतकरी नेते नंदकिशोर काळे, सतीश दाणी, सचिन डाफे, खुशाल हिवरकर, आदी सहभागी झाले होते.