video 'बाप तो बाप रहेगा' त्यांचा पायातील चप्पले सारखे...

भारताचा आशिया चषक २०२५ वर विजय

    दिनांक :29-Sep-2025
Total Views |
नवी दिल्ली
India vs Pakistan Asia Cup 2025 final आशिया चषक २०२५च्या अंतिम सामन्यात भारताने चुरशीच्या लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव करत पुन्हा एकदा आपली दमदार कामगिरी सिद्ध केली. रिंकू सिंहने अखेरच्या क्षणी विजयी फटका लगावत भारताला आशिया चषकाचे विजेतेपद मिळवून दिले. विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेत न खेळलेल्या रिंकूने अंतिम सामन्यात नायकाची भूमिका बजावत लाखो चाहत्यांच्या हृदयात आपले स्थान पक्के केले.
 
 
 

India vs Pakistan Asia Cup 2025 final  
हा सामना India vs Pakistan Asia Cup 2025 final इतका भावनिक ठरला की भारतात यंदा दिवाळी महिनाभर आधीच साजरी झाल्यासारखी उत्सवाची लाट उसळली. दुसरीकडे, पाकिस्तानमधून मात्र निराशा, संताप आणि आत्मचिंतनाचे सूर उमटले. सोशल मीडियावर पाकिस्तान संघ आणि खेळाडूंना जबरदस्त ट्रोल केले जात असून, अनेक पाकिस्तानी चाहत्यांनी थेट आपल्या संघाची तुलना भारताच्या पायातील चपलेशी करत अपमानाची परिसीमा गाठली आहे.
 
 
 
सामन्याची सुरुवात India vs Pakistan Asia Cup 2025 final पाकिस्तानने नाणेफेक जिंकून केली होती, मात्र भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने गोलंदाजी स्वीकारत सामन्याला वेगळं वळण दिलं. पाकिस्तानच्या सलामीवीरांनी सुरुवातीस दमदार ८४ धावांची भागीदारी करत चांगली घौडदौड केली होती. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यासमोर पाकिस्तानची मधली फळी कोसळली. संपूर्ण २० षटकांत पाकिस्तानला केवळ १४६ धावा करता आल्या.भारताने १४७ धावांचे लक्ष्य निर्धास्तपणे गाठले. विराट कोहली, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी मोलाच्या योगदानासह धावसंख्येचा पाठलाग सुसाट करत सामना भारताच्या बाजूने झुकवला. अंतिम क्षणी रिंकू सिंहने विजयी चौकार लगावत सामन्याचा शेवट नाट्यमय आणि भारतीय चाहत्यांसाठी अविस्मरणीय बनवला.
 
 
 
 
 
 
 
 
 
पाकिस्तानचा पराभव त्याच्या चाहत्यांना मात्र फारसा सहन झाला नाही. सोशल मीडियावर एका चाहत्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने संतप्त प्रतिक्रिया देताना आपल्या संघावरच तोंडसुख घेतलं आहे. "बाबर आझम काय सोडा, आख्खा पाकिस्तान एकत्र आला तरी भारताला हरवू शकत नाही. आपल्याला त्यांनी असा धडा शिकवलाय की कितीही पिढ्या जन्माला आल्या, तरी आपण भारताचा सामना करू शकत नाही", अशा शब्दांत त्याने आपला रोष व्यक्त केला.
 
 
 
 आनंदाचा स्रोत  हिरावला 
 
इतकंच नव्हे तर "भारत आपला बाप होता आणि बाप राहणार" असं विधान करत त्याने India vs Pakistan Asia Cup 2025 final आपल्या संघाला अक्षरशः झोडपलं. त्याने संघातील काही खेळाडूंवरही तीव्र टीका करत, "हुसैन तलतसारखे कॅच सोडणारे खेळाडू संघात असतील तर विजयाची अपेक्षा कशी करायची?" असा सवाल उपस्थित केला. त्याच्या मते, क्रिकेट हा पाकिस्तानमधील एकमेव आनंदाचा स्रोत आहे, पण आता तोही धोक्यात आला आहे.या भावनात्मक उद्गारांमुळे पाकिस्तानमधील सामान्य चाहत्यांच्या मानसिकतेचे प्रतिबिंब उमटले असून, संघाकडून सातत्याने मिळणाऱ्या अपयशामुळे जनतेचा संयम सुटल्याचे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे, भारतीय संघाचा विजय साजरा करताना देशभरात जल्लोषाचे वातावरण असून, खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 
 
भारताने पुन्हा एकदा सिद्ध केले की मोठ्या सामन्यांमध्ये संयम, नियोजन आणि सुसंवादाने विजय खेचून आणता येतो. रिंकू सिंहसारखा नवा हिरो उभा राहिला असून, भारताच्या क्रिकेट भविष्यकाळासाठी हे विजयाचे पर्व निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.