मंगरूळनाथ तालुक्यात आरोपींची धरपकड

२१ आरोपी ताब्यात

    दिनांक :29-Sep-2025
Total Views |
मंगरूळनाथ,
accused arrested वाशीम जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या आदेशानुसार मंगरूळनाथ तालुक्यात आरोपीला पकडण्याचे धाडसत्र सुरू करून आतापर्यंत तालुक्यातील २१ आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.
 
 

arrest  
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगरूळनाथ तालुक्यात विविध गुन्ह्यातील आरोपीं हे न्यायालयाने तारीख दिल्यावरही हजर राहत नव्हते. पकड वॉरंट बजावल्यानंतरही न्यायालयात हजर राहत नव्हते. त्यामुळे अशा आरोपींना २३ ते २९ सप्टेंबर या कालावधीत अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.accused arrested यामध्ये आरोपी लालसिंग चव्हाण, उमेश इंगोले, महादेव गायकवाड, प्रमोद येवले, पंडित चव्हाण, नामदेव चव्हाण, नितेश पवार, मनोज पवार, संगीतराव पवार, महादेव तायडे, शंकर चव्हाण, सिद्धार्थ बेलखडे, अंकुश राठोड, इमरान खान, मनोज भगत, बबन गुंजाळकर, शेख सद्दाम शेख रफीक, गजानन राठोड, हरिसिंग जाधव, संतोष खुळे, प्रवीण राठोड याचा समावेश असून, हे आरोपी अनेक वर्षांपासून न्यायालयात तारखेवर हजर राहत नव्हते. मंगरूळनाथ पोलिसांनी शिताफीने पकडून न्यायालयात हजर केले. सदर कारवाई पोलिस निरीक्षक किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धावडे पोकॉ हे रामविलास गुप्ता, पोकॉ राजा सावके यांनी केली आहे.