मराठवाडा, घाटमाथा आणि मुंबईत अतिवृष्टीचे संकट; २४ तासांत १० जणांचा मृत्यू

    दिनांक :29-Sep-2025
Total Views |
मुंबई,
Marathwada, Ghats in crisis due to heavy rains महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे हाहाकार माजला आहे. गेल्या २४ तासांत पावसाशी संबंधित घटनांमध्ये राज्यात १० जणांचा मृत्यू झाला असून, विविध भागातून ११,८०० हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. मुंबईत शनिवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे तर मराठवाडा आणि घाटमाथ्यावर मागील आठवड्यापासून जोरदार पावसाची नोंद आहे. दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात यावर्षी सर्वाधिक प्रमाणात पाऊस पडला आहे. गोदावरी नदीवरील जायकवाडी धरणात पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अधिकाऱ्यांनी धरणाचे सर्व दरवाजे उघडले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथून सुमारे ७,००० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १९६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
 
Marathwada, Ghats in crisis due to heavy rains
 
 
राज्यात १६ एनडीआरएफ पथके तैनात केली गेली आहेत, तर पुणे मुख्यालयात दोन अतिरिक्त पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा, Marathwada, Ghats in crisis due to heavy rains सोलापूरसह आठ जिल्ह्यांमधील पावसाळी परिस्थितीचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले. नाशिक जिल्ह्यात चार मृत्यूंची नोंद झाली आहे; त्यापैकी तीन जण घर कोसळल्याने मृत्युमुखी पडले, तर धाराशिव आणि अहिल्यानगरमध्ये प्रत्येकी दोन मृत्यू, जालना आणि यवतमाळमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद आहे. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मोठे नुकसान झाले आहे.
 
 
 
नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, रामकुंड परिसरातील काही मंदिरे पाण्याखाली गेले आहेत. शहरातील पुरग्रस्त भागातून २१ जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. हवामान विभागाने नाशिकसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, रविवार आणि सोमवारी जोरदार वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारीही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.