वर्धा,
police attacker arrested Indore, बोरगाव (मेघे) येथील शिख बेड्यावर जुगार कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करणार्या अट्टल गुन्हेगारास पोलिसांनी इंदोर मध्यप्रदेश येथून अटक केली. राजकुमार बावरी (३२) रा. शिखबेडा, बोरगाव (मेघे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांवर हल्ला करणार्या इतर २३ जणांना अटक करण्यात आली आहे. परंतु, जुगार चालविणारा व अट्टल गुन्हेगार राजकुमार बावरी हा पसार होता. पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात दोन पथके तयार केली. त्याचा शोध घेण्यासाठी रवाना केले. दोन्ही पथकांनी बुटीबोरी, नागपूर, अमरावती, अकोला व इतर ठिकाणी शोध घेतला. परंतु, तो राहण्याचे ठिकाण वारंवार बदलत आहे व एका जागेवर राहत नसल्याचे दिसून आले. त्याच दरम्यान, गोपनीय माहिती मिळाली की, राजकुमार बावरी हा इंदोर येथे गेला आहे. पोलिसांनी इंदोर गाठले व त्याचा शोध सुरू केला. चमन लॉज येथे घेराव टाकून राजकुमार बावरी याला अटक केली. पुढील तपास सावंगी पोलिस करीत आहे.