समुद्रपूर,
road accident Samudrapur, तालुयातील जाम रस्त्यावरील रेनकापूर येथील जिल्हा परिषद शाळेजवळ डोंगरगडवरुन देवीचे दर्शन घेऊन परत येत असलेल्यांच्या दुचाकीला गड्डा चुकविण्यार्या कारची धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार मोठा भाऊ ठार झाला तर लहान भाऊ गंभीर जखमी झाला. हा अपघात आज सोमवार २९ रोजी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी ४.३० वाजताच्या सुमारास सोहम कोसारे (१७) व जखमी नयन कोसारे (१५) रा. समुद्रपूर हे दोघे भाऊ डोंगरगड येथील देवीचे दर्शन घेऊन दुचाकीने जामकडून समुद्रपूरला येत असताना समुद्रपूरकडून जामकडे जात असलेल्या कार चालकाने रेनकापूर येथील जिल्हा परिषद शाळेजवळ खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार मोठा भाऊ सोहम (१७) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर लहान भाऊ नयन (१५) सह गंभीर जखमी झाला. त्याला सेवाग्राम रुग्णालय हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार रविंद्र रेवतकर यांनी आपल्या कर्मचार्यांसह घटनास्थळ गाठून दोन्ही दुघर्टनाग्रस्त वाहनांना रस्त्याच्या कडेला करून वाहतूक सुरळीत केली.या अपघातात दोन्ही वाहन चालकांचा कुठला दोष नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराने या युवकाचा मृत्यू झाला असल्याच्या भावना प्रत्यक्षदर्शी व्यत केल्या.