मुंबई,
Rupali Bhosale‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि सध्या ‘लंपडाव’ या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत झळकणारी अभिनेत्री रुपाली भोसले हिच्या लक्झरी कारला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या भीषण अपघातात रुपाली भोसले पूर्णपणे सुखरूप असून कोणतीही शारीरिक इजा झाली नाही. मात्र तिच्या नव्या कोऱ्या मर्सिडीज बेंझ कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
रुपाली भोसलेने Rupali Bhosale स्वतः आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीद्वारे चाहत्यांना या अपघाताची माहिती दिली. “Accident झाला, वाईट दिवस” असे कॅप्शन देत तिने एक व्हिडीओ शेअर केला असून त्यासोबत तिने ब्रोकन हार्ट इमोजीदेखील पोस्ट केले आहे. या व्हिडीओमध्ये गाडीच्या बोनेटला मोठा डेन्ट असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तसेच कारच्या समोरच्या भागालाही गंभीर डॅमेज झाले आहे.
रुपालीने काही महिन्यांपूर्वीच ही मर्सिडीज बेंझ कार खरेदी केली होती. आपल्या मेहनतीतून खरेदी केलेली ही कार क्षणात अशा प्रकारे अपघातग्रस्त झाल्याने अभिनेत्रीला मोठा धक्का बसला आहे. अपघात नेमका कसा घडला आणि त्यामागचे कारण काय, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी तिच्या सुरक्षिततेबद्दल समाधान व्यक्त करत तिला धीर देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
रुपाली भोसले ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळेही ती चर्चेत राहते. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील भूमिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली असून सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘लंपडाव’ मालिकेत ‘सरकार’ ही खलनायिकेची व्यक्तिरेखा साकारत आहे. या मालिकेत तिच्यासोबत चेतन वडनेरे आणि कृतिका देव मुख्य भूमिकेत आहेत.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी रुपालीच्या गाडीचे मोठे नुकसान झाल्यामुळे ही घटना तिच्यासाठी आर्थिकदृष्ट्या त्रासदायक ठरली आहे. दरम्यान, या अपघातानंतरही रुपालीने सोशल मीडियावरून चाहत्यांशी संपर्क ठेवत आपली स्थिती स्पष्ट केल्यामुळे तिच्या प्रामाणिकतेचेही कौतुक होत आहे.