मुंबई,
Siddhivinayak temple राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि इतर भागात प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी, सामान्य लोकांचे घर, शेती तसेच इतर संपत्ती नष्ट झाली असून परिस्थिती चिंताजनक आहे. या अतिवृष्टीने मराठवाडा जिल्ह्यांना सर्वाधिक तडाखा दिला आहे. अनेक ठिकाणी पाणी शिरून लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून खरीप हंगाम पूर्णपणे बुडाला आहे.
या गंभीर परिस्थितीला लक्षात घेता अनेक सामाजिक संस्था आणि व्यक्ती मदतीसाठी पुढे येत आहेत. त्यात श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंदिर न्यासाने अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 कोटी रुपयांचा मोठा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत देण्याची घोषणा केली आहे. मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
त्यांच्या माहितीनुसार,Siddhivinayak temple “महाराष्ट्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले असून या परिस्थितीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.” ही मदत थेट मुख्यमंत्री सहायता निधीत वर्ग करण्यात येणार आहे.शेतकऱ्यांच्या पिकांचे विशेष नुकसान झाले असून कापूस, सोयाबीन, तूर, मूग यांसारखी पिके पूर्णपणे बुडाली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी गुडघ्यापर्यंत साचलेले असून आर्थिक मदतीची आवश्यकता तातडीची निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष देखील शेतकऱ्यांसाठी सातबारा कोरा योजना लागू करण्याची मागणी करत आहेत.राज्य सरकारदेखील या गंभीर परिस्थितीला सामोरे जात असून केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीसाठी अर्ज केला आहे. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या मोठ्या नुकसानामुळे केंद्राकडून योग्य ती मदत मिळणे आवश्यक आहे. ती मिळेल का, आणि किती मिळेल, याकडे राज्यातील सर्वच वर्गांचे लक्ष लागले आहे.